कोकण

कोकणात व्यापाऱ्यांनी कोरून घेतली बौद्ध लेणी

शिरीष दामले

रत्नागिरी - कोकण व प्रायशः रत्नागिरी जिल्ह्यातील बौद्ध लेणी ही प्रामुख्याने व्यापाऱ्यांनी कोरून घेतली आहेत. धर्मप्रसार असा हेतू त्यामागे प्राधान्याने नसावा. संस्कृतीची देवाणघेवाण, बौद्ध भिख्खूंसाठी निवास व्यवस्था आणि धर्मपठणासाठी ही लेणी उपयोगी निश्‍चित पडली. इ. स. १२०० नंतर या भागात लेणी कोरली गेली नाहीत. त्यामुळे त्या काळापुढे या विभागात बौद्ध धर्माचा प्रसार अभावानेच झाला. सिंधुदुर्गात तर तो अपवादानेच झाला, असे निष्कर्ष डॉ. ज्ञानोबा तुकाराम कदम यांनी काढले आहेत.

चिपळूण येथील डीबीजे महाविद्यालयात इतिहासाचे अध्यापन करणाऱ्या कांबळे यांनी गेली सहा वर्षे अभ्यास करून ‘कोकणातील बौद्ध स्थापत्य कला एक ऐतिहासिक अभ्यास इ.स. १२०० पर्यंत’ हा प्रबंध लिहिला. मुंबई विद्यापीठाने त्यांना डॉक्‍टरेट बहाल केली आहे. निवृत्त प्राध्यापक दादासाहेब खडसे हे त्यांचे गाईड होते. रायगड, रत्नागिरी, ठाणे, सिंधुदुर्ग या भागात ६९५ बौद्धलेणी कागदोपत्री आहेत. कदम त्यापैकी ४०५ लेण्यांपर्यंत पोहोचले. याआधी डेक्कनच्या शोभना गोखले यांनी लेण्यांचा अभ्यास केला आहे, तर दिल्लीचे डॉ. एन. एम. देशपांडे यांनी पन्हाळकाझीतील लेण्यांवर अभ्यास केला. 

कान्हेरी (ठाणे) येथे ११२ लेण्यांचा समूह आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पन्हाळेकाझीत २८, तर कोळकेवाडीमध्ये २६ लेणी आहेत. सिंधुदुर्गात असा मोठा समूह नाही. रायगडात महाड २८, कुंडे मांदाड २६ व ठाणाळे २२ असा समूह आहे.या लेण्यांमध्ये बौद्ध स्थापत्यशास्त्राची वैशिष्ट्ये पाहायला मिळतात. यांचा कालावधी इ.स. दुसऱ्या शतकापासून ते ११ व्या शतकांपर्यंत आहे.

मौर्यकालीन लेण्यांत स्तुपांचा, सातवहन, शिलाहार व राष्ट्रकूट राजवटींच्या काळात विहार व चैत्य यांचा समावेश लेण्यांमध्ये आहे. त्याच्या जोडीला लागून स्तूप आढळतात. चिपळूणनंतर कणकवलीनजीक ऐनोली येथे लेणी आहेत ती प्रामुख्याने जैनधर्मीय आढळतात.

व्यापाऱ्यांनी आपल्या हितासाठी व्यापाराला मदत म्हणून त्यासह पत्नीच्या व मुलांच्या नावाने लेणी कोरून घेतली. सह्याद्रीतील कडक पाषाण कोरण्यासाठी उपयुक्त व व्यापारी पेठांनजीक अशी उपयुक्त परिस्थिती असल्याने या परिसरात लेण्यांची निर्मिती झाली. 
- डॉ. ज्ञानोबा कदम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : ट्रॅविस हेडने डाव सावरला; अर्धशतक ठोकत संघाला नेलं शतकाच्या जवळ

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT