Madgaon 
कोकण

Konkan Railway - आरक्षण नसलेल्या चाकरमान्यांना स्थानकात नो एंट्री

राजेश कळंबटे

परिणामी यंदाचा गणेशोत्सव गावात मोठ्या उत्साहात साजरा करण्याची तयारी पुर्वीच सुरु केली होती.

रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात दाखल झाले आहेत. उद्यापासून अनेकांचा परतीचा प्रवास सुरु होईल; मात्र ज्या प्रवाशांकडे आरक्षण आहे, त्याच प्रवाशांनी रेल्वे स्थानकात यावे. आरक्षण नसलेल्यांना प्रवेश दिला जाणार नाही असा कोकण रेल्वे प्रशासनाकडून परिपत्रकाद्वारे सांगण्यात आले.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शासनाने नियमही शिथिल केले. परिणामी यंदाचा गणेशोत्सव गावात मोठ्या उत्साहात साजरा करण्याची तयारी पुर्वीच सुरु केली होती. चाकरमान्यांचा प्रतिसाद पाहून मुंबईतून कोकणात येणार्‍यांसाठी कोकण रेल्वेने यंदा 225 हुन अधिक फेर्‍या सोडल्या आहेत. गणपतींचे आगमन झाले असून हजारो चाकरमानी कोकण रेल्वेने गावात दाखल झाले आहेत. काहींचे गणपती दीड दिवसांचे तर काहींचे पाच दिवसांचे असतात.

विसर्जन सुरु झाले की गावाकडे आलेले गणेश भक्त पुन्हा मुंबईकडे परतू लागतात. काही चाकरमानी आगमनावेळी दर्शन घेऊन माघारी परतात. त्यांच्यासाठी कोकण रेल्वेकडून नियोजन झालेले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोठेही गर्दी होऊ नये, या करिता कोकण रेल्वेच्या प्रत्येक स्थानकात प्रवेशद्वारावरच बॅरेगेटिंग करण्यात आले आहे. आरोग्य विभागाच्या माध्यमातून येथे येणार्‍या प्रवाशांची तपासणी केली जाते. त्यांची नोंद करुन त्यांना पुढे पाठविण्यात येते.

रेल्वे पोलिस आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने येणार्‍या-जाणार्‍या प्रवाशांच्या गर्दीचे नियंत्रण केले जात आहे. दीड दिवसाच्या गणपती विसर्जनानंतर चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासाला सुरवात होईल. यावेळी केवळ आरक्षण असलेल्या प्रवाशांना स्थानकाच्या प्रवेश दिला जाणार आहे. ज्यांच्याकडे आरक्षण नाही, अशा मंडळींनी स्थानकावर गर्दी करू नये त्यांना स्थानकाच्या आत प्रवेश दिला जाणार नाही. आरक्षण असलेल्या मंडळीनाही तपासणी करीता गाडीच्या निर्धारित वेळेपूर्वीच उपस्थित रहावे असे आवाहन कोकण रेल्वेकडून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway traffic jam : मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर पुन्हा वाहतूक कोंडी; खंडाळा बोगद्याजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा

Latest Marathi News Live Update : शिवजयंतीनिमित्त सिंहगड घाटात रांगोळीच्या पायघड्या

Sugar Factory : कारखाने वर्षभर सुरू ठेवण्यासाठी हालचाली, मल्टिफीडसाठी ६३ कारखान्यांचा पुढाकार

T20 WC, IND vs NED: ...अन् मोठा अनर्थ थोडक्यात टळला! सूर्यकुमार - रिंकू सिंगची जोरात धडक अन् चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला; Video

Chhatrapati Shivaji Maharaj:विदर्भभूमी शिवरायांच्या पदस्पर्शाने ६ वेळा पावन, आग्रा कैदेतून सुटल्यानंतर विदर्भातून प्रवास

SCROLL FOR NEXT