for city scan treatment the private hospitals charge extra amount from patients relatives in ratnagiri 
कोकण

सिटी स्कॅनसाठी आकारली जातीये दुप्पट रक्कम

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण : कोरोना रुग्णांकरिता राज्य सरकारने सिटी स्कॅनच्या दरांवर नियंत्रण आणले आहे. सिटी स्कॅनसाठी दोन ते तीन हजार रुपयांहून अधिक शुल्क आकारता येणार नाही, असे आदेश जारी करण्यात आले आहेत, तरीही चिपळुणातील काही खासगी डॉक्‍टर सिटी स्कॅनसाठी चार ते सात हजार रुपये शुल्क घेत आहेत. यामुळे रुग्ण, नातेवाईक हतबल झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून कोरोना संक्रमणाचा वेग वाढला आहे.

रोज शंभरहून अधिक रुग्ण कोरोनाबाधित आढळत आहेत. यातील बहुतेक रुग्णांना छातीतील संसर्ग व न्युमोनियासाठी सिटी स्कॅन करण्याचा सल्ला डॉक्‍टरांकडून देण्यात येतो. सिटी स्कॅनसाठी रुग्णांना किमान साडेतीन ते सात हजार रुपये मोजावे लागतात. चिपळूण शहरातील खासगी रुग्णालयामध्ये अनधिकृतपणे कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत. काही रुग्णालयांमध्ये अनधिकृतपणे चाचण्याही सुरू आहेत.

पूर्वी केवळ ब्लड, युरीन चाचणी घेणाऱ्या लॅबमध्ये आता विविध प्रकारच्या चाचण्या सुरू झाल्या आहेत. विविध प्रकारच्या चाचण्या करणाऱ्या रुग्णांकडून भरमसाट शुल्क आकारले जाते. हा ‘कट प्रॅक्‍टिस’चा प्रकार तर नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे. सिटी स्कॅनसाठी चार ते सात हजार रुपये खर्च करावे लागतात. रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक तक्रार करीत नाहीत. याचा फायदा घेत डॉक्‍टर आणि डायग्नोस्टिक सेंटर चालकांकडून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांची लूट सुरू आहे. 

असे आहेत शासकीय दर

- १६ स्लाइस सिटी स्कॅन : २ हजार रुपये 
- १६ ते ६४ सिटी स्कॅन : दोन हजार ५०० रुपये 
- ६४ स्लाइससाठी सिटी स्कॅन : तीन हजार रुपये

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बापरे! लोकप्रिय अभिनेत्रीचा भीषण अपघातात मृत्यू, वयाच्या ३० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Gold Price Crash : सोनं-चांदी स्वस्त झालं की गुंतवणूक बुडाली? 24 दिवसांत किमतीत तब्बल 60 हजारांची घसरण; काय घडतंय बाजारात? गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले

Latest Marathi News Live Update : 'आप'चे आमदार पठाणमाजरा यांना ग्वाल्हेरमधून अटक

US Iran War Victory : अमेरिकेने युद्ध जिंकल्याचा ट्रम्प यांचा दावा, म्हणाले- इराणने आम्हाला मोठं गिफ्ट पाठवलं

Hotel Close Ratnagiri : रत्नागिरीत २५० हॉटेलचे ‘शटर बंद’, शिवभोजन थाळीही बंद सर्वसामान्यांची फरफट

SCROLL FOR NEXT