Karnataka Mango Alphonso esakal
कोकण

Ratnagiri : आंबा विकायचा असेल तर 'अशी' पाटी लावा, अन्यथा..; रेल्वेस्थानकावरील विक्रेत्यांना तंबी

आंबा उत्पादन कमी असल्याने विक्रेते कर्नाटकी आंबा हापूसच्या नावाने विकत असल्याचे पुढे आले होते.

सकाळ डिजिटल टीम

रेल्वेस्थानकावरील स्टॉलधारकांना कर्नाटकी आंबाविक्रीबाबत कडक सूचना दिल्या आहेत.

रत्नागिरी : कर्नाटकमधील आंबा हापूसच्या (Karnataka Mango Hapus) नावाखाली विक्री करणाऱ्‍यांविरोधात स्थानिक आंबा बागायतदारांची मोहीम सलग दुसऱ्‍या दिवशीही सुरू आहे. काल सकाळी बागायतदारांनी रेल्वेस्थानकावर धडक देत तेथील स्टॉलधारकांशी संवाद साधला.

कर्नाटकी आंबा विकायचा असेल तर तेथे ग्राहकाला समजेल, अशी पाटी लावा अन्यथा विकू नका, अशी तंबी दिली. आंबा उत्पादन कमी असल्याने विक्रेते कर्नाटकी आंबा हापूसच्या नावाने विकत असल्याचे पुढे आले होते. या विरोधात बागायतदारांनी मोहीम हाती घेतली आहे.

सकाळी रेल्वेस्थानकावर धडकलेल्या बागायतदारांना स्थानिक शेतकऱ्‍याकडून रत्नागिरी हापूस (Ratnagiri Hapus) लिहिलेल्या बॉक्समधून कर्नाटकी आंबा दिल्याची माहिती समजली. स्थानकावरील स्टॉलधारकाकडे सुमारे ६० बॉक्स होते. त्या विक्रेत्याकडून बागायतदारांनी संपूर्ण माहिती घेतली.

या वेळी स्थानिक बागायतदार निशांत सावंत, प्रशांत सावंत, पावस परिसर आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष बावा साळवी, धनराज सावंत, श्रेयस सावंत, मंगेश साळवी यांच्यासह अन्य बागायतदार होते. शहरात काल सकाळी विक्रेत्यांची झाडाझडती घेतल्याने रत्नागिरी रेल्वेस्थानकावर आज फक्त दोनच विक्रेते होते. त्यातील एकाकडे कर्नाटकी आंबा होता. त्या विक्रेत्याने तशी पाटीही लावलेली नव्हती.

याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली तसेच कर्नाटकी आंबा विकायचा असेल तर तसा फलक येथे लावा जेणेकरून ग्राहक फसणार नाही; परंतु त्या विक्रेत्याने कर्नाटकी आंबा विकणार नाही, अशी ग्वाही बागायतदारांना दिली. आंब्याचे बॉक्स देणाऱ्यांकडूनच आपली फसवणूक झाल्याचेही त्या विक्रेत्याने बागायतदारांना सांगितले. या माहितीच्या आधारे आंबा बॉक्स देणाऱ्यांची भेट घेऊन या प्रकरणाच्या मुळात जाणार असल्याचे बागायतदार निशांत यांनी सांगितले.

रेल्वेस्थानकावर बागायतदारांनी झाडाझडती सुरू केल्यानंतर रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बागायतदार आणि विक्रेत्यांशी संवाद साधत दोन्ही बाजूही समजून घेतल्या. या ठिकाणी परराज्यातील पर्यटक ये-जा करत असतात, ते हापूस खरेदी करतात. त्यांच्याकडे चुकीचा आंबा जाऊ शकतो. यासाठी आम्हाला हे पाऊल उचलावे लागल्याचे बागायतदार यांनी सांगितले.

रेल्वेस्थानकावरील स्टॉलधारकांना कर्नाटकी आंबाविक्रीबाबत कडक सूचना दिल्या आहेत. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, आंबा पुरविणाऱ्‍या स्थानिक शेतकऱ्‍याचीही आम्ही भेट घेणार आहोत, तसेच कॅनिंगला कर्नाटकी आंबा प्रक्रिया करून रत्नागिरी अल्फान्सो मँगो पल्प नावाने विक्री करू नका, अशी सूचना केली जाणार आहे.

- निशांत सावंत, आंबा बागायतदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: सरकार मराठा समाजापेक्षा मोठं नाही; 29 ऑगस्टच्या आंदोलनाबाबत जरांगेंचा थेट इशारा, अंतरवालीत येण्याचे आवाहन

Koyna Dam Water Level कोयना ९२ टक्के भरले, ६ दरवाजे ३ फुटापर्यंत उघडणार; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Dombivli News: अल्पवयीन मुलीचा लोकलच्या धडकेत मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण, पोस्टमार्टम रिपोर्ट समोर; तरुणाला अटक, ३ महिन्यापूर्वी...

Marathi News Live Updates : हैद्राबादमधील पेट्रोल आणि डिझेल रिक्षांचे ईव्हीमध्ये रूपांतर करण्यासाठी सरकाकडून १.५ लाख रुपयांपर्यंतचे अनुदान

AUS vs BAN 1st Test : बांगलादेशमुळे कसोटी क्रिकेटमध्ये भूकंप! ऑस्ट्रेलिया चारीमुंड्या चीत, भारताचा फायदा; वाचा WTC Final Scenario

SCROLL FOR NEXT