Corona already and now the rain has learned kokan marathi news 
कोकण

आधिच कोरोना आणि आता पाऊस काय करायच कळेना....

सकाळ वृत्तसेवा

दापोली (रत्नागिरी) : काल सायंकाळी दापोली तालुक्यात मेघगर्जनेसह पाऊस पडला असून काही गावांमध्ये गाराही पडल्या असून हाताशी आलेले आंबा पीक हातचे जाते कि काय याची चिंता आंबा बागायतदारांना भेडसावू लागली आहे.

तयार झालेला आंबा कोठे विक्रीस पाठवायचा हा प्रश्न ....
काल सायंकाळी 5.30 वाजणेचे सुमारास ढगांचा गडगडाटासह पाऊस पडला, तालुक्यातील जालगाव, आंजर्ले, पिचलोडी यांसह अनेक गावांत गारांसह मुसळधार पाऊस पडला, अनेक ठिकाणी बच्चेकंपनीने या पावसाचा आनंद लुटत गारा गोळा केल्या.
सध्या कोकणात आंबा व काजूचा हंगाम सुरू झाला असून मुंबई व पुणे येथील कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद असल्याने तयार झालेला आंबा कोठे विक्रीस पाठवायचा हा प्रश्न बागायतदारांना पडला.

असतानाच आज अवकाळी पाऊस पडल्याने आंबा पिकाचे नुकसान होणार आहे, काही ठिकाणी अजून आंबा तयार झालेला नाही तेथील आंब्यावर या  पावसाचा परिणाम होणार असल्याने बागायतदार चिंतेत पडला आहे, एकीकडे तयार आंब्याला बाजारपेठ नाही त्यात हा पाऊस यामुळे अनेक छोटे बागायतदार धास्तावले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: संजू सॅमसनचे शतक अन् CSK ची मुंबईत घुसून दादागिरी! आयपीएलमधील सर्वात मोठा विजय, गुणतालिकेत मोठी उलथापालथ

Video Viral : येडे गबाळे! PSL च्या टॉसच्या वेळेस मारामारी, डेव्हिड वॉर्नरला काय चाललंय कळेना... हसावं की पळावं? झाला कन्फ्युज...

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली मोठा गैरव्यवहार! महिलांकडून वसुली पूर्ण, पण पुरुषांवर निर्णय प्रलंबित का?

West Bengal Voting : स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच पश्चिम बंगाल-तामिळनाडूत विक्रमी मतदान, निवडणूक आयोगाचा मतदारांना सलाम

Sanju Samson Century: १० चौकार, ६ षटकार! संजूच्या शतकाने मोडले अनेक विक्रम; रोहित शर्माशी बरोबरी, गिलख्रिस्टवर पडला भारी

SCROLL FOR NEXT