corona positive case in ratnagiri dapoli  
कोकण

ब्रेकिंग- दापोलीत कोरोनाचा शिरकाव; 65 वर्षीय महिलेला लागण 

सकाळ वृत्तसेवा

दापोली : दापोली तालुक्‍यातील माटवण येथील 65 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे आज स्पष्ट झाले. दापोली तालुक्‍यात पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. या महिलेला अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात येणार आहे. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्‍यातील माटवण येथील संबंधित महिला मुंबई येथे राहते. तिच्या पोटाचे ऑपरेशन झाले होते. त्यामुळे तीने मुलगा व सुनेकडे गावी जाण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार मुलगा आणि सून तिला ऍम्बुलन्समधून गावी 30 एप्रिल रोजी पहाटे घेऊन आली. मुंबईहून आल्याने तिला दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयातील अलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. तिचा स्वॅबचा नमुना तपासणीसाठी मिरज येथे पाठविण्यात आला होता. आज त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे प्रशासनासह आरोग्य विभागामध्ये खळबळ उडाली आहे. या संदर्भात पुढील उपाययोजना करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. या महिलेच्या संपर्कात कोण कोण आले, त्याची माहिती घेतली जात असून या महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती जिल्हाधिकारीलक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली. 

दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून कोरोनाबाधित महिलेच्या मुलाला आणि सुनेला क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांचेही स्वॅब तपारणीसाठी घेण्यात येणार होते. परंतु, तपासणीचे किट शिल्लक नसल्याने स्वॅब घेतले नाहित 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil Resign : शरद पवार गटाने अखेर भाकर फिरवली....जयंत पाटलांचा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा, नवा प्रदेशाध्यक्षही ठरला!

अमृता सुभाषची 'फसवणूक'? ब्लॅक पेजवरील पोस्टने चाहते संभ्रमात! म्हणाली, 'याबद्दल बोलूच पण...'

Latest Marathi News Updates : भारतीय न्याय व्यवस्थेत सुधारणा गरजेच्या : सरन्यायाधीश गवई

"म्हणून शोमधून मी बाहेर पडले" इंडियन आयडॉलमधून काढण्याबद्दल मिनी माथुरचा धक्कादायक खुलासा; "खोट्या.."

जेव्हा मनीषा कोईरालाच्या 'त्या आरोपांनी ऐश्वर्या रायला बसलेला धक्का; धाय मोकलून रडलेली अभिनेत्री, नंतर...

SCROLL FOR NEXT