खेड (रत्नागिरी) : येथील पालिकेच्या इंधन घोटाळ्यात एकापाठोपाठ एक बाबी उघड होत आहेत. तीन वर्षांत २ लाख १७ हजार ७१२ रुपये खासगी गाड्यांच्या इंधनाचा खर्च पालिकेच्या तिजोरीतून केला आहे, असा आरोप रामदास कदम यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे.
रामदास कदम म्हणाले, ‘‘सप्टेंबर २०२० मध्ये पालिकेच्या जेसीबीमध्ये भरण्यासाठी ३६ हजार ८२० रुपयांचे इंधन खरेदी केले आहे. मे २०१९ मध्ये कॅनमधून २ हजार ४३४ रुपयांचे डिझेल खरेदी केल्याचे दिसून येत आहे. २०१८ मध्ये २९ हजार ६१४ रुपये, सन २०१९ मध्ये २७ हजार ७६४ तर सन २०२० मध्ये १ लाख ६० हजार ३३४ रुपये असा एकूण २ लाख १७ हजार ७१२ रुपये इंधन खर्च करण्यात आला. त्यामध्ये जून २०२० मध्ये ३२ हजार ४७७ रुपयांचे इंधन खासगी वाहनांमध्ये भरण्यात आले आहे.
माहितीच्या अधिकारात मिळालेल्या वाहन क्रमांकामध्ये काही क्रमांकाची वाहने दरमहा पालिकेच्या पैशातून इंधन भरून घेत असल्याचे आढळत आहे. पालिकेला दिलेल्या बिलांमध्ये वाहन क्रमांक पूर्ण नमूद केलेला आढळून येत नाही. संबंधित एजन्सी व नगर पालिकेसाठी इंधन खरेदी करण्यासाठी जाणारे यांची चौकशी झाल्यास अपहार उघड होईल.
व्यवहाराची चौकशी करावी
पालिकेला इंधन पुरवठादार एजन्सीकडून परिपूर्ण नोंदी ठेवण्यात आल्या नसल्याचा आरोप शिवसेनेने केला. जीवनावश्यक वस्तू असलेल्या इंधनाच्या व्यवहाराची शासनाने तातडीने चौकशी करावी, अशी मागणी शिवसेनेने केली.
पालिकेच्या पैशातून ९ लाखांचे इंधन
नंबर नसलेल्या वाहनांमध्ये सन २०१८ ते २०२० या कालावधीत ९ लाख ८ हजार ४३३ रुपयांचे इंधन पालिकेच्या पैशातून खरेदी केले आहे. त्यामध्ये मार्च २०२० मध्ये ५६ हजार ८२३ तर ऑगस्ट २०२० मध्ये ५५ हजार ४६३ रुपयांचे इंधन खरेदी केल्याची बाब माहितीच्या अधिकारात उघड झाली, असा दावा कदम यानी केला.
स्वतःच्या खिशातून इंधन भरतात
या संदर्भात नगराध्यक्ष खेडेकर यांना विचारले असता, त्यांनी सांगितले की, मी माहिती घेऊन बोलेन. खेड पालिकेचे बजेट खूपच छोटे आहे. त्यामुळे विरोधक कारण नसताना आरोप करत आहेत. माझे सर्व कार्यकर्ते हे स्वतःच्या खिशातून आपापल्या गाडीत इंधन भरतात. त्यामुळे चौकशीअंती सगळ्याच गोष्टी उघड होतील.
संपादन - स्नेहल कदम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.