crime news in sindhudurg kankavli illegal alcohol found rupees 11 lakh 
कोकण

११ लाखाची गोवा बनावटीची अवैध दारू जप्त ; रेल्वे बंदमुळे रस्त्यांच्या आधाराने होते वाहतुक

सकाळ वृत्तसेवा

कणकवली (सिंधुदुर्ग) : गोवा येथून रत्नागिरीकडे जाणाऱ्या मोटारीतून महामार्गावरील हळवल फाटा येथे गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली. स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाने सकाळी ही कारवाई केली. यात ११ लाख ५५ हजार ६०० रुपयांची गोवा बनावटीची दारू आणि ७ लाख रुपये किंमतीची मोटार, असा एकूण १८ लाख ५५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अवैधपणे दारू वाहतूक प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले.

गोवा येथून रत्नागिरीच्या दिशेने जाणाऱ्या मोटारीतून दारू वाहतूक होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्यानुसार सकाळी मुंबई गोवा महामार्गावरील हळवल फाटा येथे सापळा रचला होता. यात महामार्गावर मोटार येताच ते अडविण्यात आले. या वाहनाची तपासणी केली असता प्लास्टिक क्रेटच्या मागे लपविलेले रियल विस्की १८० मिलीचे ५० बॉक्‍स व ७५० मिलीचे ५० बॉक्‍स, गोल्डन फाईन विस्कीचे १८० मिलीचे ५० बॉक्‍स व ७५० मिलीचे ५० बॉक्‍स, मेगडोलचे १८० मिलीचे बारा ७५० मिलीचे १० व ३७५ मिलीचे तीन बॉक्‍स असे मिळून २२५ बॉक्‍स आढळले. त्यांची किंमत ११ लाख ५५ हजार ६०० रुपये व वाहनांची किंमत सात लाख, असे एकूण १८ लाख ५५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.

गोवा येथून रत्नागिरीत गोवा बनावटीची दारू वाहतूक करणाऱ्या मोटारीतील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ते संगमेश्‍वर (जि. रत्नागिरी) येथील आहेत. या दोघांवर अवैध दारू वाहतूक प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, गोवा ते रत्नागिरी अशी दारू वाहतूक करणारी मोटार पकडण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने रात्रभर सापळा रचला होता.

कारवाईचे शिलेदार

पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, पोलिस निरीक्षक सुनील धनावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सचिन शेळके, शाहू देसाई, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रामचंद्र शेळके, हवालदार सुधीर सावंत, अनिल धुरी, प्रकाश कदम, आशिष गंगावणे, प्रमोद काळसेकर प्रथमेश गावडे, प्रवीण वालावलकर, चंद्रहास नार्वेकर, रवींद्र इंगळे, ज्ञानेश्वर कांदळगावकर, चंद्रकांत पालकर, संकेत खाड्ये यांच्या पथकाने ही कारवाई केली. 
 

रेल्वे बंद, रस्त्याचा आधार

सिंधुदुर्गप्रमाणेच लगतच्या रत्नागिरी जिल्ह्यातही गोवा बनावटीची दारू गावागावात उपलब्ध होत असून, तसे नेटवर्कही अवैध दारू विक्रेत्यांनी तयार केले आहे. सध्या कोकण रेल्वे मार्गावरील नियमित गाड्या बंद आहेत. तसेच विनाआरक्षित तिकीट विक्री बंद असल्याने रेल्वेतून दारू वाहतुकीवर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे रस्तामार्गे अवैध दारू वाहतूक केली जात आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UGC NET परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या तुमचा विषय कधी आहे?

T20 World Cup साठी आज भारतीय संघाची घोषणा, कुणाला संधी, कोण बाहेर? 'या' पाच प्रश्नांची मिळणार उत्तरं...

थरारक प्रसंग! मृत्यूच्या दाढेतून परतले महसूल अधिकारी! माळशिरस महामार्गावर दोन तरुणांच्या धाडसामुळे वाचले प्राण, क्षणभर उशीर झाला असता तर...

Mumbai Mega Block : मुंबईत ब्लॉकमुळे उद्या १३ रेल्वेंवर परिणाम

Vidarbha Cold Wave: विदर्भात थंडीचा कडाका: नागपूर पारा ८.५ अंश, गोंदियेत ८ अंश सेल्सिअस

SCROLL FOR NEXT