crime register against five persons in ratnagiri 
कोकण

 जातीवाचक शिवीगाळ केल्याने पाच जणांवर गुन्हा दाखल 

मुझफ्फर खान

चिपळूण - तुरंबव येथील शारदादेवीच्या मंदिरात झालेल्या जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी अखेर पाच जणांवर सावर्डे पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

तुरंबव येथील शारदादेवी देवी मंदिरातील सभा मंडपात 6 ऑक्टोबरला नवरात्र उत्सवाच्या अनुषंगाने गाव कमिटी व ट्रस्ट कमिटी यांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत देवीच्या ओट्या भरण्यावरून मोठा वाद झाला होता. 

उत्सवाच्या काळात देवीची रूपे लावायची मात्र ओट्या फक्त पंडित लोकच भरतील असे सुभाष पंडित यांनी सागितले. त्याला गाव कमिटीचे सदस्य श्रीधर पालशेतकर यांनी विरोध केला.

 भरायच्या असतील तर सर्व ग्रामस्थांना भरायला द्या असे सांगताच संशयित आरोपी दिगंबर श्रीराम पंडित, नारायण संभाजी पंडित, सुभाष श्रीराम पंडित, दत्ताराम श्रीराम पंडित, कृष्णा भिकाजी पंडित यांनी श्रीधर पालशेतकर यांना जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर श्रीधर पालशेतकर यांनी सावर्डे पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर संशयितांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव वाघमारे अधिक तपास करीत आहेत.


संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PADMA AWARDS: पद्म पुरस्कारांची मोठी घोषणा! तमाशा कलाकार रघुवीर खेडकरांचा होणार पद्म पुरस्काराने सन्मान

T20 World Cup : पाकिस्तानने माघार घेतल्यास कोणता संघ त्यांची जागा घेईल? भारतासमोर बघा कोणता संघ उभा ठाकेल

"होता जिवा म्हणून वाचला शिवा"! शिवरायांचा जीव वाचवणाऱ्या जिवा महालाचे वंशज सध्या कुठे असतात? इतकी दयनीय अवस्था अन् हातावरचं पोट..

Weather Maharashtra : प्रजासत्ताक दिनाला महाराष्ट्रात पावसाची स्थिती! हवामान अंदाज आला समोर, तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती?

Padma Awards 2026 List: देशाचा सन्मान, महाराष्ट्राची ओळख; पद्म पुरस्कार २०२६ मध्ये राज्यातील 'ही' व्यक्तिमत्त्वे चमकली

SCROLL FOR NEXT