Narayan Rane sakal media
कोकण

राणेंच्या पायगुणावरून शिवसेना आमदाराचा पंतप्रधानांना सल्ला

सध्या महाराष्ट्रात कोणीही उठतो आणि राज्य सरकारवर बोलतो, शिवसेनेनं घेतला समाचार

सकाळ वृत्तसेवा

सध्या महाराष्ट्रात कोणीही उठतो आणि राज्य सरकारवर बोलतो, शिवसेनेनं घेतला समाचार

सावंतवाडी : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) हे जर ‘मातोश्री’वरील चौघांना ईडी लवकरच नोटीस बजावणार असल्याचे सांगत असतील तर हा तपास यंत्रणेचा अपमान आहे. देशातील सर्वोच्च संस्थांचा तपास समजतोच कसा? असा सवाल शिवसेना (Shivsena MLA) आमदार दीपक केसरकर यांनी केला. सुशांत सिंग (Sushantsing Rajput) प्रकरणाची फाईल पुन्हा उघडेल, असे सांगायला राणे केंद्रीय गृहमंत्री आहेत का? असा प्रश्नही त्यांनी यावेळी केला.

यावेळी आमदार केसरकर (Deepak Kesarkar) यांनी राणेंच्या आरोपांचा समाचार घेतला. ते म्हणाले, ‘‘सध्या महाराष्ट्रात कोणीही उठतो आणि राज्य सरकारवर बोलतो. वारंवार ईडीची भीती घातली जाते, हे योग्य नाही. तुम्ही जेवढा महाविकास आघाडीतील नेत्यांना त्रास देणार तेवढे हे सरकार आणखी पेटून उठेल. ईडीसारख्या (ED) तपास यंत्रणा देशातील सर्वोच्च आहेत; मात्र त्यांचा गैरवापर होत असून सामान्य माणूसही हे जाणून आहे. त्यामुळे प्रत्येकाने हे ओळखले पाहिजे. लोकशाहीत जनता महत्त्वाची असून तत्कालीन पंतप्रधान (PM Modi) इंदिरा गांधी यांनाही पराभूत व्हावे लागले होते. राणे यांनी ‘मातोश्री’वरच्या चौघांना लवकरच ईडी नोटीस बजावेल, असे म्हटले आहे.

भाजपचे विचार आम्हाला समविचारी वाटायचे; पण राणेंसारखे नेते पक्षात घेऊन भाजप वेगळ्याच दिशेला वाहत जाऊ लागला आहे. जेथे राणे तेथील सत्ता जाते, हे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही लक्षात ठेवावे. राणेंना सुधारण्याची संधी होती; पण ते सुधारू शकत नाहीत. संजय राऊत यांनी राणेंवर आरोप केले नव्हते. तरीही ते पुढे का आले? सोम्यागोम्यांना ईडीच्या कारवाया समजत असतील तर तपास यंत्रणेचे महत्त्व कसे राहील? सुशांत सिंग राजपूत व दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची फाईल पुन्हा उघडणार, असे राणेंनी सांगायला ते केंद्रीय गृहमंत्री आहेत का? सीबीआयने अद्याप या तपासाची फाईल बंद केली नाही, मग ती कशी उघडणार? केवळ बदनामीचा प्रकार सुरू आहे. या देशात अद्याप उच्च व सर्वोच्च न्यायालये आहेत, एवढे लक्षात ठेवा. जनता तुम्हाला कधीतरी जाब विचारेल. त्यामुळेच उत्तर प्रदेशसारख्या राज्यात एक युवा नेतृत्व तुमची झोप उडवत आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Metro News: पुण्यातील भुयारी मेट्रो मार्गावर आता ‘रूट मार्कर’ बसणार; बोगद्याला मोठे छिद्र, नागरिकांना परवानगी घ्यावी लागणार!

Sikkim Tourism: सिक्कीममधील गुरुडोंगमार सरोवर पुन्हा खुले, पण नियम मोडल्यास प्रवास रद्द!

Satara News: साताऱ्यात स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांची परवड; गॅसटंचाईमुळे खाणावळी बंद, विद्यार्थी गावी परतल्याने अभ्यासिका ओस

IPL 2026 Marathi News: मुंबई इंडियन्स सहावे जेतेपद पटकावणार का? एक गोष्ट जी वाढवू शकते टेंशन, जाणून घ्या त्यांची बेस्ट Playing XI

Pune News: पुण्यातील बुधवार पेठेतील पोलिसांची अल्पवयीन मुलींवरील कारवाई बेकायदेशीर; तथ्यशोध समितीचा आरोप, बालहक्कांचे उल्लंघन!

SCROLL FOR NEXT