Deepak Patvardhan Can Again Ratnagiri BJP District President  
कोकण

रत्नागिरी भाजप जिल्हाध्यक्ष होणार कोण ? 

सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी - भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी पुन्हा ऍड. दीपक पटवर्धन यांची निवड होण्याची शक्‍यता आहे. सुमारे सहा महिन्यांपूर्वी त्यांची जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झाली. भाजपच्या केंद्रीय निवडणुका झाल्यानंतर आता प्रदेश पातळीवरून सर्व जिल्ह्यांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली. उद्या रत्नागिरी जिल्ह्याची निवडणूक होणार आहे. 

उद्या (ता. 29) सकाळी 11 ते 12 या वेळेत रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनायाच्या सभागृहात ही प्रक्रिया पार पडणार आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून खासदार मनोज कोटक काम पाहणार आहेत. त्यांच्यासमवेत विधान परिषद आमदार प्रसाद लाड, संघटनमंत्री सतीश धोंड, माजी आमदार बाळ माने आदी प्रमुख उपस्थित राहणार आहेत. 
स्वच्छ प्रतिमा, कामाचा धडाका, संपर्क आदी गोष्टी पाहता पुन्हा पटवर्धन यांची वर्णी लागण्याची शक्‍यता आहे.

याकरिता जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष, मंडल अधिकारी, पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. ही निवड पुढील तीन वर्षांसाठी होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दोन जिल्हाध्यक्ष करण्याबाबत गेले काही दिवस चर्चा सुरू आहे. याचा अंतिम निर्णय अद्याप कळू शकलेला नाही. भाजप प्रदेशाकडून यासंदर्भात माहिती मिळालेली नाही. परंतु जिल्ह्यातील सर्वच तालुकाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात आल्याचे समजते. निवडणूक प्रक्रिया बिनविरोध होण्याची शक्‍यता आहे. 
 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP removes spokesperson Vijeta Dahiya : कॉकरोच जनता पार्टीत फूट? प्रवक्ता विजेता दहियांचे संस्थापक अभिजीत दिपकेंवर गंभीर आरोप, 'मलाच बळीचा बकरा बनवलं'

Kidney Donation Case : बॉसला किडनी दिली तरीही कंपनीने नोकरीवरुन काढले, महिलेला माणुसकी जपणे पडले महागात; नेमकं काय घडलं?

Latest Marathi Update : उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा! शिवाजी पार्कवरून मोर्चा काढणार

रवी शास्त्रींनी निवडला भारत-इंग्लंडचा All Time XI संघ; धोनी कर्णधार, तर गांगुलीला मात्र...

Anganwadi Nutrition: अंगणवाडीत नोव्हेंबरपासून मिळणार ‘व्हेज पुलाव’; कुपोषणाविरुद्ध पाऊल, पोषण आहार झाला अधिक रुचकर

SCROLL FOR NEXT