esakal
कोकण

रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यात 'त्या' 5 गावांतील निर्बंध शिथिल

कोंडगाव बाजारपेठ ७८ दिवसानंतर सुरू; ४० गांवे अवलंबून

प्रमोद हर्डीकर

साडवली : कोरोनाचा जिल्ह्यातील (corona) वाढता प्रादुर्भाव व नवीन आलेला डेल्टा प्लस व्हेरीएंट (delta plus variant) यामुळे संगमेश्वर तालुक्यातील (sangameshwar) नावडी, माभळे, कसबा, कोंडगाव ही गावे विषाणूबाधित क्षेत्र म्हणून जाहीर केली होती. यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमावस्था होती. मात्र, सोमवारी नव्याने जाहीर झालेल्या कोरोना (ratnagiri district) नियमावलीप्रमाणे या गावातील निर्बंध शिथिल झाले असून सोमवारपासून सकाळी ७ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेतील व्यापार सुरू झाला आहे. कोंडगाव बाजारपेठ ७८ दिवसानंतर उघडण्यात आली. चाळीस गावे या बाजारपेठेवर अवलंबून आहेत.

रत्नागिरी जिल्हाधिकारी तसेच आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांनी, डेल्टाचे रुग्ण आढळले आहेत, असे जाहीर केल्याने निर्बंध कडक करण्यात आले होते. शासनाच्या निरीक्षणानुसार नावडी, माभळे, कसबा, कोंडगाव या भागात विषाणूबाधित क्षेत्र घोषित करण्यात आले होते. यावरुन गदारोळ सुरू झाला होता. नागरिकांनी या गावातील निर्बंध शिथिल करण्यासाठी आमदार शेखर निकम, राजन साळवी, तसेच मंत्री उदय सामंत यांच्या गाठीभेटी घेवून विनवण्या केल्या होत्या.

संगमेश्वरला सीईओच्या गाडीला घेराओ घातला होता. अखेर सोमवारपासून जिल्ह्यात कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्यात आले. यामध्ये अत्यावश्यक सेवा सकाळी ७ ते सायंकाळी ४ यावेळेत सुरु राहतील, असे जाहीर करण्यात आले. यानुसार नावडी, कसबा, माभळे, कोंडगाव या गावातील निर्बंधही शिथिल झाल्याने या गावातील अत्यावश्यक सेवेची दुकाने उघडली गेली. संगमेश्वर तालुक्यात डेल्टा प्लस रुग्णाचा झालेला मृत्यू यामुळे तालुक्यात खळबळ उडाली होती.

शंभर टक्के टेस्ट करणार; सरपंच शेट्ये

सध्या शेतीचा हंगाम सुरू असल्याने बाजारपेठ सुरू होणे आवश्यक होते. मात्र, त्यासाठी सर्वांची कोरोना टेस्ट सुरू करण्यात आली व त्याला प्रतिसाद देखील चांगला मिळाला. टेस्ट शंभर टक्के करण्याचा मानस सरपंच बापू शेट्ये यांनी केला आहे.

आर्थिक घडी कोलमडली..

कोंडगाव बाजारपेठ कोरोना महामारीच्या वाढत्या संसर्गामुळे १४ एप्रिलपासून बंद होती. ७८ दिवस बाजारपेठ बंद असल्याने आर्थिक घडी कोलमडली होती. आता बाजारपेठ सुरू झाल्याने सर्वानाच हायसे वाटले. चाळीस गावे या बाजारपेठेवर अवलंबून असल्याने लॉकडाऊनमुळे या गावांतील जनता देखील लॉक झाली होती.

---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Muhurat Trading 2025: 'मुहूर्त ट्रेडिंग'च्या दिवशी शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स 267 अंकांनी वाढला, कोणते शेअर्स चमकले?

Bhandara News: भंडाऱ्यातील पोलिस पाटील भरती प्रक्रिया रद्द; उच्च न्यायालय, संपूर्ण निवड प्रक्रिया संशयास्पद आणि अयोग्य

Heart Attack Case : महाकाल मंदिरात भस्मआरतीदरम्यान भक्ताचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; WhatsApp स्टेट्सवर लिहिलं होतं, 'आयुष्य क्षणभंगुर आहे...'

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरच्या एसटीपीला राष्ट्रीय स्तरावर मान्यता; पाच कोटींचं विशेष अनुदान

Kolhapur Killing Mystery : कोल्हापुरातील 'त्या' दोघांचा बिबट्याच्या हल्ल्याने मृत्यू नाहीचं, वृद्ध दांपत्याच्या मृत्यूचे गूढ वाढले

SCROLL FOR NEXT