Devarukh unions collected 50 thousand rupees in poor people kokan marathi news 
कोकण

निदान एकवेळचे तरी अन्न मिळावे म्हणुन देवरुखकर आले मदतीला...

प्रमोद हर्डीकर

साडवली (रत्नागिरी) :कोरोनामुळे बाजारपेठा बंद आहेत.तरीही देवरुख बाजारपेठेतील दुकानदारांनी गोरगरीबांना धान्य व आवश्यक वस्तु देण्यासाठी ५० हजार रुपये जमवले तसेच विविध संस्थानाही मदत करायला लावून लाखाचा माल गोरगरीबांना देवून माणुसकी जपली.

देवरुख बाजारपेठ व्यापारी संघटनेने प्रशासनाला सहकार्य केले.व्यापारी वर्गाने आवाहन करुन सामाजिक बांधिलकी म्हणुन ५० हजाराचा निधी गोळा केला.व्यापारी दरात ना नफा ना तोटा दरात जिन्नस पॅकेट तयार केली व त्याचे आवश्यक कुटुंबाना वितरण करण्यास सुरुवात केली आहे.

गावकरी आले मदतीला..
देवरुख मधील व्यापारी वर्गाच्या या मोहिमेत संस्था संघटना सहभागी झाल्या.आकार ऑर्गनायझेशन युवा विभाग,संगमेश्वर तालुका बॅडमिंटन क्लब,महाराष्ट्र नवनिर्माण सेना देवरुख शहर,देवरुख लायन्स क्लब,संगमेश्वर तालुका प्रेस क्लब आदिंनी यात योगदान दिले आहे.बाबा सावंत,कांता पोकळे,निलेश चव्हाण,मंगेश प्रभुदेसाई,उल्हास नलावडे,संजु पटेल,प्रमोद हर्डीकर,राणु कोचिरकर,सागर संसारे भोलु पटेल अभिषेक अग्रवाल,राजु जागुष्टे आदिंसह सर्व सहकार्‍यांनी यात योगदान देवून माणुसकी जपली.

जपली माणुसकी.
कोरोनामुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत.दळणवळणाची साधने नसल्याने अनेक कुटुंबांना उपासमारी घडत आहे.या कुटुंबांना निदान एकवेळचे तरी अन्न मिळावे म्हणुन बाजारपेठ बंद असुनही व्यापारी वर्गाने निधी गोळा करुन अन्नधान्य देवून सामाजिक बांधिलकी जपली.संस्था ,संघटना ,राजकीय पक्ष,पञकार यांनीही यात हातभार लावून लाखमोलाची कामगिरी पार पाडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 3rd Test: रिषभ पंत आर्चरचा लॉर्ड्सवर सामना करण्याबद्दल म्हणाला, 'तो परत येण्याचा मला...'

Video: मी इथेच आहे, तुझ्यासोबत! पत्नी आयसीयूमध्ये, पतीने हात धरला अन्...; वृद्ध जोडप्याचा व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

Viral Video: कसाबसा जीव वाचला! रस्त्याची पाहाणी करायला आलेल्या अभियंत्यासमोरच कोसळला ट्रक, जीव वाचवण्यासाठी लोकांची पळापळ

World Heritage status: शिवरायांच्या किल्ल्यांना 'युनेस्को'चा दर्जा मिळण्यास का लागतोय वेळ? गडांच्या व्यवस्थापनावर समितीने ठेवलं बोट

Mumbai News: जैन मंदिरावरील कारवाई योग्यच, उच्च न्यायालयाने ट्रस्टचे अपील फेटाळले

SCROLL FOR NEXT