Devrukha School Student The Thrill Of The Sukhoi Mirage Raphael Planes 
कोकण

'या' विमानांच्या दुनियेत रमली देवरुखातील विदयार्थी....

सकाळ वृत्तसेवा

साडवली (रत्नागिरी) : देवरुख मधील स्नेह परीवार लहान मुलांसाठी विविध उपक्रम राबवत असते. याच मुलांसाठी देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या सहकार्याने एरोमाॅडेलींग शोचे आयोजन केले होते. देवरुख महाविद्यालयाच्या प्रशस्त मैदानात सुखोई, मिराज, राफेल अशा विमानांच्या कसरतींचा थरार ६ हजाराहून अधिक मुलांनी अनुभवला. या मुलांचे कुतुहल पाहण्यासाठी मुलांबरोबर पालक, शिक्षकही मैदानात हजर होते.

सातारा येथील प्रसिद्ध विमान छांदिष्ट सदानंद काळे यांचा हा शो आहे. अथर्व काळे व अक्षय काळे हे विमान उडवण्याचे काम करतात. देवरुख महाविद्यालयाच्या मैदानात विमान कसरतींचा दोन तासांचा खेळ रंगला. मुलांनी एकच गलका करत हा प्रयोग एंजाॅय केला. विमान व त्याचे तंञ या मुलांनी शिकुन घेतले व घरी विमान बनवण्यासाठी संचही विकत घेतले. एरोमाडेलिंग शो मध्ये ग्लायडर, उडती तबकडी, मासा याबरोबरच सुखोई, मिराज, राफेल या वायुदलातील विमानांच्या कसरतींचा थरार या मुलांनी अनुभवला. 

कावळे विमानाच्या मागे लागले
यासाठी देवरुख परीसराबरोबरच रत्नागिरी, लांजा, साखरपा, संगमेश्वर, हातीव या भागातील मुले व पालक हजर होती.
 सुरुवातीला ईगल पक्षाच्या रुपातील विमान हवेत उडवले गेले व ते फिरु लागल्यावर परीसरातील कावळे ही या ईगल विमानाचा पाठलाग करु लागले. हा प्रसंग नेहमीच येतो असे काळे यांनी सांगितले. गेली तीस वर्ष सदानंद काळे हा एरोमाॅडेलिंगचा छंद जोपासत असुन विमान प्रकारात मुलांमध्ये जागृती व्हावी, मुलांना विमान तंञ समजावे यासाठी ते सतत प्रयत्नशील रहात आहेत. संयोगिता काळे ,सदानंद काळे हे दोन मुलांसह हा विमान प्रवास अनुभवत आहेत. देवरुखमधील स्नेह परीवाराच्या  या शो साठी देवरुख हायस्कुल,शाळा नं.४ तसेच देवरुख महाविद्यालयाने सहकार्य केले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Fire: जंगली महाराज रोडवर भीषण आग! पेट्रोल पंपामागील गॅरेज जळून खाक, अग्निशमन दलाच्या ५ गाड्या दाखल

Stock Market : आज शेअर बाजारात या PSU शेअरचा जलवा! गुंतवणूकदार मालामाल; जाणून घ्या पुढे काय?

Kolhapur Fraud Case : तीन वर्षांपासून पसार असलेला ग्रोबझ फसवणुकीतील आरोपी अखेर जेरबंद; २६ हजार गुंतवणूकदारांच्या पैशांचा तपास वेगात

स्टार प्रवाहाने पाच स्लॉट गमावले; टीआरपीमध्ये झी मराठीची चलती; 'तारिणी', 'कमळी'नंतर आणखी एका मालिकेचा जलवा

ठाकरे गट, काँग्रेस आणि भाजप आमनेसामने! मतदार कुणाकडे झुकणार? वाचा BMC निवडणुकीत अंधेरी पश्चिमचे समीकरण

SCROLL FOR NEXT