कोकण

मंडल अधिकाऱ्यासाठी लाच घेणाऱ्यास पकडले

सकाळवृत्तसेवा

देवगड - खरेदी केलेल्या जमिनीच्या खरेदीखताची नोंद करण्यासाठी शिरगाव मंडळ अधिकारी यांच्या वतीने सुमारे पंचवीस हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने एका खासगी व्यक्‍तीला पकडले. अमित सुरेश कदम (वय ३४, रा. किंजवडे) असे त्या संशयिताचे नाव आहे. त्याच्यासह शिरगाव विभागाचे मंडळ अधिकारी आनंदा संभाजी कांबळे (वय ५०) यांना लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतले. आज सायंकाळच्या सुमारास येथील तहसील कार्यालयाच्या परिसरातच ही कारवाई करण्यात आली.

अलीकडेच एक तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यात सापडला होता. आता या प्रकाराने पुन्हा एकदा महसूल प्रशासनाचे धाबे दणाणले. याबाबत पोलिस उप अधीक्षक दीपक दळवी यांनी दिलेली माहिती अशी, की यांतील तक्रारदार यांना त्यांच्या एका मित्राने खरेदी केलेल्या जमिनीच्या खरेदीखताची नोंद करावयाची होती. यासाठी संशयित मंडळ अधिकारी कांबळे याने त्यांच्याकडे ८५ हजार लाचेची मागणी केली होती.

तडजोडीअंती २५ हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार संबंधित तक्रारदाराने त्यासंदर्भात बुधवारी (ता. सहा) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला याची माहिती दिली होती. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने काल (ता. सहा) आणि आज याची पडताळणी केली. त्यानुसार येथील तहसील कार्यालयाच्या परिसरात लाचलुचपत विभागाच्या पथकाने आज सापळा रचला.

पूर्वी झालेल्या तडजोडीअंती ठरलेली सुमारे २५ हजारांची लाच स्वीकारल्याच्या स्थितीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने खासगी व्यक्‍ती कदम याला रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून २५ हजार हस्तगत केले. त्यामुळे मंडळ अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात सापडले. पथकाने दोघांनाही पकडले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे परिक्षेत्राच्या पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली.

पोलिस उप अधीक्षक दीपक दळवी यांच्यासह पोलिस निरीक्षक मितीष केणी, पोलिस निरीक्षक युवराज सरनोबत, जनार्दन रेवंडकर, पोलिस नाईक जितेंद्र पेडणेकर, महेश जळवी, अजित खंडे, प्रथमेश पोतनीस, महिला पोलिस तनुजा राऊळ आदींचा या पथकात समावेश होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT