due to heavy rain the transport of amboli ghat stopped causes collapse of tree in sawantwadi 
कोकण

आंबोली घाटातील दुपारपासून ठप्प झालेली वाहतुक सुरळीत

रुपेश हिराप

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : येथील आंबोली घाटात नानापाणी येथील वळणावर रस्त्यावर झाड आडवे पडल्याने सावंतवाडी-आंबोली वाहतुक ठप्प झाली. हा प्रकार आज बारा वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सदरचे झाड बाजुला हटवित या मार्गावरील वाहतुक सुरळीत करण्यात आली.

सावंतवाडी तालुक्यात परतीच्या पावसाने जोर धरला आहे. गेली चार-पाच दिवस पावसाची संततधार कायम आहे. बुधवारी सकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह सुमारे एक तास पावसाने मजल मारली. सोसाट्याच्या वाऱ्याने आंबोली घाटात पायथ्याशी नानापाणी येथे एका वळणावर रस्त्याच्या बाजूला दरडीवर असलेले झाड रस्त्यावर आडवे पडले सदरचे झाड भलेमोठे असल्याने दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णतः ठप्प पडली. दरम्यान बांधकाम विभागाने घटनास्थळी जेसीबी तसेच कर्मचारी पाठवून सदर चे झाड बाजूला करून वाहतूक पूर्ववत सुरू केली.

दरम्यान या परिसरात पावसाची संततधार कायम असल्याने झाडे पडणे, दरड कोसळणे असे प्रकार घडत असतात. परिणामी सुरु असलेल्या या पावसाला जोर आणि वाऱ्याच्या वेगही जास्त आहे. आंबोली घाटात वरचेवर अशा घटना घडत असतात. मात्र झाड बाजूला केल्याने वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे. 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Traffic: कल्याणमध्ये वाहतुकीत बदल! 'हा' महत्त्वाचा पूल २० दिवस बंद, काय असतील पर्यायी मार्ग?

India T20 World Cup Squad: अजित आगकरने संघ जाहीर केला, तरी १५ जणांमध्ये होऊ शकतो बदल; ICC चा नियम काय सांगतो?

Epstein Files: जेफ्री एपस्टाईनच्या मृत्यूनंतरही ‘काळा इतिहास’ उघड; कागदपत्रे कोण प्रकाशित करत आहे? नेमकी सुत्रे कुणाच्या हाती?

Hrithik Roshan Uttarakhand Trek: हृतिक रोशनने अनुभवला उत्तराखंडच्या डोंगरांचा निसर्गमय ट्रेक; चाहत्यांनी विचारलं ‘जादू मिला क्या?

तरुणी नशेत बेधूंद होऊन घरी आली, घरमालकानं पाहिलं अन् मागून येऊन...; पीजी मालकाचं भयंकर कृत्य; पुणे हादरलं

SCROLL FOR NEXT