During Lockdown Boy Got Stuck In Punjab Ratnagiri Marathi News
During Lockdown Boy Got Stuck In Punjab Ratnagiri Marathi News  
कोकण

लाॅकडाऊनच्या काळात मुलगा पंजाबात अडकला अन्....

सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी - लॉकडाऊनचा काळ, मुलगा शिकायला पंजाबमधील विद्यापीठात, तेथून येण्याबाबत अनिश्‍चितता, रोजच्या नव्या बातम्या, काहीवेळा तर तेथे परिसरात कोरोनाची लागण झाल्याच्या बातम्या यातून आम्हा मातापित्यांचे हृदय घाबरले होते. एवढ्यात दूरवरून मुलाला आणायचे कसे? आमचा एकच मुलगा नव्हे, सोबत शिकणारे अनेकजण अडकले होते. अशा स्थितीत राजकीय पक्षांपासून ते सरकारी यंत्रणेचे विविध अनुभव आले. मात्र ज्याचा शेवट गोड ते सारे गोड या न्यायाने मुलगा परतला आणि आम्ही हुश्‍श केले, अशी भावना सौ. मुग्धा कुळ्ये यांनी व्यक्त केली. 

लॉकडाऊन ते मुलाचे परतणे या काळातील आंदोलने सांगताना त्यांनी दीड महिन्याचा पटच "सकाळ'शी बोलताना उलगडला. 22 मार्चचा लॉकडाऊन आम्ही पाळला. परंतु 31 मार्च, 17 एप्रिल, 3 मे, असा लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने वाढत चालला तसतसा माझा धीर सुटू लागला. कारण माझा मुलगा पंजाब जालंदर येथे लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीत शिकतोय. तो होस्टेलवर अडकला होता.

दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढतच होते. एवढ्या लांबून मुलाला सुरक्षित महाराष्ट्रात आणायचे कसे? सारंच अनिश्‍चित. मुलाच्या काळजीने आमचा जीव इकडे कासावीस होत होता. पंजाबमधील रुग्णांची संख्याही वाढतच होती. सहजासहजी परतीचे मार्ग बंद झाले होते. लॉकडाऊन संपेल तेव्हाच मुलगा येऊ शकतो, असे वाटू लागल्याने त्यामुळे इथून त्याचं मनोबल वाढवण्यासाठी आमची मानसिकता त्याला कळू देत नव्हतो. सातत्याने त्याच्या संपर्कात राहून धीर देत सुरक्षित राहण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याबाबत सांगत होतो. नाहीच संपलं लॉकडाऊन तर पुढील सत्र कंटिन्यू करूनच ये, अशीही मानसिकता करण्याचं काम करत होतो. 

कुळ्ये म्हणाल्या की, अशात एक दिवस बातमी कळली की गर्ल्स हॉस्टेलमधील एका मुलीला कोरोनाची लागण झाली आहे. मी खूपच घाबरले. मग या युनिव्हर्सिटीचे महाराष्ट्रातील प्रतिनिधी कारंडे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनीही धीर देऊन सांगितले की, महाराष्ट्राच्या मुलांना परत आणण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. होस्टेलवर मुलांच्या सुरक्षेच्यादृष्टीने खूप कडक नियम करून मुलांना अजिबात बाहेर पडू दिलं नाही. खाणं-पिणं, सर्व व्यवस्था मेसने रूम सर्व्हिस दिली. या काळात आम्ही पालकही इतकी काळजी घेऊ शकलो नसतो इतकी येथील युनिव्हर्सिटी व्यवस्थापनाने घेतली. तिथे मागे राहिलेल्या महाराष्ट्रीयन मुलांचा शोध घेणे अवघड होते. 

राष्ट्रवादीच्या नेत्यांची मदत 
प्रसादकुमार खेडकर व चैतन्य घाटगे या सीनियर मुलांनी महाराष्ट्रातील तिथे राहिलेली सर्व मुलं शोधून काढली. ग्रुप तयार केला. महाराष्ट्रात जाण्यासाठी काय करता येईल हे सर्व मिळून ठरवू लागले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते आदींच्या प्रयत्नांना यश येऊन महाराष्ट्र शासनाने मुलांना पंजाबमधून आणण्यासाठी हालचाली सुरू केल्या. तसे युनिव्हर्सिटीला पत्र दिले. महाराष्ट्र शासन, पंजाब शासन व एल पी यु युनिव्हर्सिटी यांच्या समन्वयाने आमच्या मुलांना महाराष्ट्रात येण्यासाठी अनुकूल परिस्थिती तयार झाली. 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT