expanding of boundary of chiplun city increased development of rural area in chiplun ratnagiri 
कोकण

चिपळूणची हद्दवाढ ग्रामीण अर्थव्यवस्थेला पोषक ; लवकरच हद्दवाढ होण्याचे संकेत

मुझफ्फर खान

चिपळूण (रत्नागिरी) : हद्दवाढीचा निर्णय झाल्यास पालिका आणि लगतच्या ग्रामीण भागातील नागरिकांच्या अर्थव्यवस्थेला उभारी मिळणे अपेक्षित आहे. शहरालगतचा ग्रामीण भाग शहरी भागात येत असल्याने आपोआप त्यांच्या मालमत्तेचे मूल्य वाढणार आहे. शहरात ज्या पद्धतीने भाजी मार्केट, चित्रपटगृह नाट्यगृह, सांस्कृतिक केंद्रे आहेत. त्याच पद्धतीची व्यवस्था ग्रामीण व उपनरी भागात होईल. यातून ग्रामीण भागात रोजगार मिळण्यास 
मदत होईल. 

शैक्षणिक संकुल, खासगी शिकवण्या यातून शहर विकासाला चालना मिळेल. जागा नाही, म्हणून शहरात न होणारी सर्वांगीण डेव्हलपमेंट हद्दवाढीमुळे शक्‍य होईल. मॉल संस्कृती ग्रामीण भागापर्यंत पोचेल. हॉटेल्स, लॉजिंगची प्रशस्त व्यवस्था शक्‍य होईल. ब्रॅंडेड कंपन्यांचे शो रूम्स आणि आउटलेटही ग्रामीण भागात पोहचतील. मूळ शहरात येणारा नागरिकांचा लोंढा कमी होईल. शहरात एकदम विस्तीर्ण भाग मिळाल्यामुळे सर्वच ठिकाणी योग्य दरातून स्पर्धेतून विकासाला चालना 
मिळेल.

हद्दवाढीमुळे किमान पाच वर्षानंतर पालिकेच्या उत्पन्नातही हुकमी वाढ होणार आहे. घरपट्टी, पाणीपट्टीसह इतर मार्गातून पालिकेचे उत्पन्न वाढणार आहे. ग्रामीण भागातील जागांच्या किमती वाढणार आहेत. त्याचा शहर आणि परिसरातील उत्पन्नवाढीसाठी मोठा हातभार लागणार आहे. सध्याची उपनगरे शहरात येतील. हद्दवाढीचा नवा भाग उपनगरे बनतील. त्यातून येथेही बहुमजली इमारतींचे संकुल उभे राहण्यास काहीच अडचण राहणार नाही. त्यातून छोटे-मोठे व्यवसाय सुरू होतील. रुग्णालये सुरू होतील. सेवाक्षेत्र आणखी विस्तारून त्याचा थेट फायदा ग्रामीण भागातील नागरिकांच्या अर्थकारणावर होईल.

"ग्रामीण भागाचे शहरीकरण झाले की आपोआपच राहणीमान उंचावते. सध्या ग्रामीण भागात होणारे व्यवहार थेट शहराशी होतील. त्यातूनही अर्थकारण वाढेल. ग्रामीण भाग विभागलेला आहे. तो क्‍लस्टर पद्धतीने हद्दवाढीमुळे एका पालिकेच्या छताखाली येईल. यातूनच ग्रामीण भागातील हिस्सा पालकेला मिळेल. यातून चिपळूण शहराची मोठ्या नगराकडे वाटचाल सुरू होईल."
 

- लियाकत अरकाटे, चिपळूण

"एखाद्या ब्रॅंडचे शोरूम चिपळुणात येताना लोकसंख्या आणि राहणीमान याचा विचार होतो. जिल्ह्यात सर्वाधिक ब्रॅंडेड चहाची दुकाने चिपळुणात सुरू झाली. कपडे, वाहन, मोबाईल आणि इतर शो रूम्स चिपळुणात आहेत. यावरून चिपळूणचे किती महत्त्व आहे, हे लक्षात येते. हद्दवाढीमुळे जागा उपलब्ध होईल. स्पर्धेमुळे प्लॉटचे दरही नियंत्रणात राहतील. यातून मार्केटमध्ये पुन्हा एकदा अर्थकारण वाढेल."

- राकेश जाधव, खेर्डी

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT