Farmer Experiment Success Story In Ratnagiri Kokan Marathi News 
कोकण

'या' शेतकऱ्यांसारखा प्रयोग कराल तर व्हाल मालामाल....

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी: कोकणात कातळावर नंदनवन फुलवण्याचे आव्हान रत्नागिरी तालुक्‍यातील डोर्ले येथील शेतकरी अजय तेंडुलकर यांनी लीलया पेलले आहे. अटल सौर कृषी पंप योजनेचा पुरेपूर उपयोग करत साडेतीन वर्षांपूर्वी १६ एकरवर लागवड केलेल्या आंबा, काजू, नारळाच्या बागेतून लाखो रुपयांचे उत्पन्न घेण्यास सुरवात केली आहे. विजेच्या बचतीचा संदेश तेंडुलकर यांनी दिला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात पहिला सौर कृषी पंप तेंडुलकर यांनी घेतला. मुंबईत व्यवसायात असले तरी अजय यांना गावच्या मातीची ओढ गप्प बसू देत नव्हती. २००५ साली ते गावी परतले. पहिल्याच वर्षी बॅंकेकडून अडीच लाखांचे कर्ज घेत पाच एकर जागेवर आंबा, काजू आणि नारळाची लागवड केली. २०१६ साली त्यांनी दुसऱ्या टप्प्यात डोर्ले गावाच्या वेशीवरील १६ एकरची जागा विकसित केली. कातळावर नंदनवन फुलवण्यासाठी पाण्याची गरज होती.

महावितरणकडे प्रस्तावही दिला;  परंतु मुख्य डीपीपासून सुमारे पाच खांब टाकल्यानंतर विजेचा पुरवठा सुरू होणार होता. त्यासाठी किमान सव्वा लाख रुपयांचा खर्च होता. त्याचवेळी सौर कृषी पंप योजनेचा प्रसार सुरु होता. अटल सौर कृषी पंप योजनेतून त्यांना सौर पंप मिळाला. सबसिडीवर दोन युनिट १६ एकरच्या बागेत लावली. तीन एचपी क्षमतेचा पंप त्यावर दिवसभर चालतो.

जिल्ह्यातील पहिले युनिट

एका युनिटसाठी फक्‍त २२ हजार ५०० रुपये भरावे लागले. सौर कृषी पंपाचा जिल्ह्यातील हे पहिले युनिट होते. त्या युनिटमधून दिवसाला तीन किलोवॅट वीजेची निर्मिती होते. त्यावर सकाळी ७ ते सायंकाळी ४.३० पर्यंत दोन पंप सुरू राहतात. तीन वर्षानंतर उत्पन्न सुरु झाले असून दीडशे काजूच्या झाडातून तिसऱ्याच वर्षी ४५० किलो बी मिळाली. दीडशे पेटी आंबा मिळाली असून नारळही लागत आहे.

चार जणांनी घेतले सौरपंप
अजय यांनी खाडीलगत असलेला चार एकर खाजण जमिनीचा भाग विकसित केला. त्यात नारळाची लागवड केली आहे. त्या ठिकाणी सौर युनिट बसवले आहे. डोर्ले गावातील आणखीन चार शेतकऱ्यांनी सौर पंप युनिट घेतली असून, सुमारे ४० ते ५० एकर कातळ फळबाग लागवडीखाली आली. अजय यांच्या प्रयोगशिलतेमुळे सौर पंपाचा यशस्वी प्रयोग अन्य शेतकरी करू लागले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadanvis Statement : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्र्यांनी मौन सोडलं, खात्यांचा पदभार सोपवला

IND U19 vs SL U19 SF Live: भारत-श्रीलंका सामना रद्द झाल्यास कोण जाईल फायनलला? बांगलादेशकडून पाकिस्तानचा करेक्ट कार्यक्रम

Latest Marathi News Live Update : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात

Epstein Files Explained : मोदी सरकार कोसळणार? एपस्टीन फाइल्स काय आहे, भारतातील नेते का घाबरले? संपूर्ण माहिती एका क्लिकवर...

Success Story: रामटेकच्या कार्तिक बावनकुळेचा युपीएससीत डंका; आयआयटी जमले नाही, युपीएससीला घातली गवसणी

SCROLL FOR NEXT