father in law suicide after daughter in law suicide at ratnagiri 
कोकण

सासरा सतत करायचा शरीर सुखाची मागणी, कंटाळून तिने केले असे काही की...

सकाळ वृत्तसेवा

खेड (रत्नागिरी) : सासर्‍याच्या अनैतिक मागणीमुळे होणार्‍या मानसिक छळाला कंटाळून विवाहितेने विषाची गोळी घेऊन आत्महत्या केली. सुनेने गाठलेले टोक आणि त्यामुळे आपले भांडे फुटणार या भीतीने पछाडलेल्या सासर्‍यानेही सुनेच्या आत्महत्येनंतर विषाची गोळी घेऊनच स्वतःला संपवले. ही घटना रविवारी (ता. 26) घडली. 

तालुक्यातील चिंचघर गावात नारंगी नदीवरील वीटभट्टीवर काम करणार्‍या आदिवासी समाजातील एका कुटुंबात ही करुण कहाणी घडली. या प्रकरणी महिलेच्या पतीने पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनीही दखल घेतली. मात्र सासर्‍याने आत्महत्या केल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले.


रायगड जिल्ह्यातील माणगावचे हे कुटुंब. खेडला येण्यापूर्वी ते पुणे जिल्ह्यात पिरंगुट येथे कामानिमित्त राहात होते. मृत महिलेच्या पतीने खेड पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

मयत महिलेचा मृतदेह अंत्यविधीसाठी पुणे जिल्ह्यातील पिरंगुट येथे नेण्यात आला. त्यावेळी तिच्या चुलतीने आत्महत्येचे कारण पतीला सांगितले. ते धक्कादायक होते. मृत माहिला मागील अनेक दिवसापासून चुलतीला फोनवर सासरा तिच्याकडे वारंवार शरीरसुखाची मागणी करायचा व त्यासाठी तिला त्रास देत होता, असे सांगत होती. याच कारणाने तिने विषारी गोळी खाऊन आत्महत्या केली, असे सांगितले. पतीला ही गोष्ट पटल्यावर त्याने खेड पोलिस ठाण्यात तशी तक्रार दिली. मात्र सुनेने आत्महत्या केल्यानंतर काही वेळातच सासर्‍यानेही आत्महत्या केली. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक अडकुर करीत आहेत.

विषारी गोळी मिळाली कुठून

या आदिवासी कुटुंबांच्या हातात विषारी गोळी कशी लागली, याबाबत माहिती घेता ही गोळी मासेमारीसाठी उपयोगात आणली जाते. ती पाण्यात टाकली की मासे मरतात. रूपालीला या विषारी गोळीची माहिती होती म्हणून तिने ती घेतली आणि लगेच ती मृत झाली. पोलिसांनी विषारी गोळीबाबत सासऱ्याला विचारले असता त्याने वेताळवाडीत एक ओळखीचा माणूस देतो असे सांगितले. पोलिस त्याला गोळी देणाराकडे गाडीतून घेऊन जात असतानाच गोळी देणार्‍याकडे पोहोचण्याआधीच वाटेत त्याचा मृत्यू झाला. मृत सासऱ्याने ती गोळी आधीच खाल्ली असावी. त्यामुळे विषारी गोळी देणारा कोण ते कळले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maruti Suzuki: मारुती सुझुकी इंडियाचे गुजरातमधील 'या' कंपनीसोबत विलीनीकरण होणार, एनसीएलटीकडून मोठी मान्यता

Mumbai News: मुंबईकरांना दिलासा वाहतूक कोंडीतून मिळणार! MMRDA ७० किमीचा भूमिगत बोगदा बांधणार, वाचा संपूर्ण प्लॅन

Ranji Trophy, Video: ६,६,६,६,६,६,६,६.... सलग ८ षटकार अन् वेगवान अर्धशतक; २५ वर्षीय भारतीय फलंदाजाने घडवला इतिहास

Matoshree Drone: मातोश्रीवरून ड्रोन उडवल्याचे प्रकरण; आदित्य ठाकरेंचे खळबळजनक दावे, ५ प्रश्न करत संशय व्यक्त केला, म्हणाले...

Shirur Crime : टाकळी हाजी येथे शेताच्या वादातून हल्ला; दोघे जखमी, लोखंडी गज व विटेचा वापर!

SCROLL FOR NEXT