Five containers of Hapus to Oman, including the Arab Emirates kokan marathi news 
कोकण

Good News : आता हापूसचे पाच कंटेनर अरब अमिरातीसह ओमानकडे..

राजेश कळंबटे

रत्नागिरी : हापूसच्या निर्यातीला चालना देण्यासाठी गेले काही दिवस पणन, कृषी विभागाकडून सुरु असलेल्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले आहे. मुंबईतील वाशी मार्केटमधील पाच कंटेनरमधुन सुमारे 105 मेट्रीक टन हापूस समुद्रमार्गे संयुक्त अरब अमिराती आणि ओमानला रवाना झाला आहे. आंबा बागयातदारांसाठी ही दिलासादायक गोष्ट ठरली आहे.


कोरोनामुळे देशासह परदेशातही अनेक ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्याचा परिणाम शेतमालासह विविध प्रकारच्या फळांच्या निर्यातीला खो बसला होता. ऐन हंगामात ही परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आंबा बागायतदार हवालदिल झाले होते. सुमारे पाच ते दहा टक्के आंबा तयार झाला असून त्याची विक्री कशी करायची असा प्रश्‍न आवासुन उभा होता; मात्र गेल्या आठ दिवसात शेतमाल वाहतूकीला मिळालेली परवानगी बागायतदारांसाठी उपयुक्त ठरली. त्यामुळे बागांमधील तयार आंबा किमान बाजार समितींपर्यंत पोचवणे शक्य होऊ लागले आहे.

त्यानंतर पणन मंडळ, कृषी विभाग, आत्मा यासह काही खासगी व्यापार्‍यांनी हापूसच्या विक्रीसाठी थेट ग्राहकांपर्यंत साखळी निर्माण करण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत.हापूस विक्रीचे वाशी हे सर्वात मोठे केंद्र आहे. गेल्या तिन दिवसांमध्ये कोकणामधून सुमारे 22 हजार पेट्या वाशीत दाखल झाल्या. हा माल विक्री कुठे करायचा हा प्रश्‍न होता. त्यादृष्टीने आखाती देशांमधील निर्यातीला चालना देण्यासाठी हालचाली सुरु होत्या. त्याला अखेर यश मिळाले.

बागायतदारांना  दिलासा 

समुद्रमार्गे शुक्रवारी (ता. 4) पाच कंटेनर मुंबईतून
रवाना झाले. त्यातील चार कंटेनर संयुक्त अरब अमिरातीला तर एक कंटेनर ओमानला जाणार आहे. या दोन्ही देशांना पुरवण्यात आलेला माल निर्यातदारांमार्फत पाठविला गेल्याचे पणन मंडळाकडून सांगण्यात आले. एकूण 105 मेट्रीकटन आंब्याची निर्यात सुरु झाल्यामुळे वाशीत साठा होणार नाही. निर्यातीला झालेली सुरवात आंबा बागायतदारांना दिलासा देणारी ठरु शकते. 12 एप्रिलनंतर मोठ्याप्रमाणात आंबा दाखल होणार आहे. सध्या मालाला ग्राहक नसल्यामुळे दर पडलेले आहेत. पाचशे रुपयांपासून ते दोन हजार रुपयांपर्यंत पेटीला मिळत आहेत.
निर्यातीला पाठवलेल्या आंब्यालाही माफक दर मिळाला आहे.

आत्मामार्फत 440 पेटी सातार्‍यात

उपविभागिय कृषी अधिकारी जी. बी. काळे यांच्यासह राजापूर तालुका कृषी अधिकारी जगताप यांच्या प्रयत्नातून राजापूर आणि रत्नागिरीतील सुमारे 440 आंब्याच्या पेट्या आत्माच्या माध्यमातून कराड, सातारा, फलटणला शनिवारी रवाना झाल्या आहेत. शेतकरी ते थेट ग्राहक अशी यंत्रणा आत्माच्या माध्यमातून राबविण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ST Bus Accident : येरमाळा घाटात बसचा अपघात! प्रवाशांनी प्रत्यक्ष मृत्यूचा साक्षात्कार अनुभवल्याची थरारक घटना, क्षणार्धात बस सुमारे २० ते २५ फूट खोल खड्ड्यात कोसळली

8 Feet Crocodile Spotted in Krishna River : औदुंबरच्या कृष्णा नदीच्या डोहात आढळली आठफुटी मगर; घाटावर दररोज उन्हात बसताना दिसल्याने भाविकांमध्ये खळबळ

Sudden Underarm Pain: काखेत अचानक दुखायला लागलंय? साधी वेदना समजून दुर्लक्ष करू नका; 'या' कारणांमुळे होऊ शकतो त्रास

Latest Marathi News Live Update : नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

Sugarcane Crisis : महाराष्ट्राचे ठरले, कर्नाटकातील गळीत हंगाम कधी? साखर कारखान्यांना दुहेरी फटका बसण्याची शक्यता; उताऱ्यात घट अन्‌ दराचाही परिणाम

SCROLL FOR NEXT