four more corona positive cease fund in ratnagiri
four more corona positive cease fund in ratnagiri 
कोकण

मोठी बातमी ; रत्नागिरीत आणखी आठ जणांना कोरोनाची लागण, संख्या पोहोचली...

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी - मुंबईतून आलेल्या संगमेश्‍वर येथील आठ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आल्यामुळे बाधित रुग्णांची संख्या 42 वर पोचली आहे. रविवारी (ता. 10) दिवसभरात 102 अहवाल निगेटीव्ह आले असून 1123 जणांचे अहवाल अजूनही मिरज येथील प्रयोगशाळेत प्रलंबित आहेत. सद्यःस्थितीत रत्नागिरी जिल्हा रेडझोनमध्ये समाविष्ट नसल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. चाकरमान्यांचा ओघ भविष्यात वाढणार असल्यामुळे जिल्ह्यावर टांगती तलवार निर्माण झाली आहे.


सलग दुसर्‍या दिवशी जिल्ह्यातील पॉझिटीव्ह रुग्णाच्या संख्येत भर पडली आहे. रविवारी आलेल्या अहवालांपैकी संगमेश्वर येथील चार जणांना कोरोना लागण झाल्याचे दिसून आले. त्यात कळंबुशी आणि फुणगूस येथील प्रत्येकी एक तर धामपूर भायजेवाडी दोन जणांचा समावेश आहे. या सर्वांचे स्वॅब नमुने 9 मे 2020 रोजी घेण्यात आले होते. त्या चौघांचाही मुंबई प्रवासाचा इतिहास आहे. त्यातील दोन जण चेंबूर येथून आले होते तर एक जण कांदिवलीतून आणि एक जण पनवेल येथून आलेला होता. त्या सर्वांना संस्थात्मक क्वांरटाईन करुन ठेवण्यात आलेले होते. कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढल्यामुळे प्रशासनापुढील आव्हाने वाढली आहेत.


मुंबई, पुण्यासह इतर जिल्ह्यातील लोकांना आणण्यासाठी प्रशासनाकडून कार्यवाही सुरु झाली आहे. त्यांना घरीच विलगीकरणासाठी ठेवण्याबाबत हालचाली सुरू आहेत. संस्थात्मक विलगीकरणातून ग्रुपने रुग्णाचा प्रसार होण्याची दाट शक्यता आहे. मुंबईतून येणार्‍यांची कशेडी घाटात तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी सहा वैद्यकीय पथके कार्यरत आहेत. तसेच नोंदणी करण्यासाठी दहा लोकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. येणारा प्रवासी कोठून कोठे जाणार याची माहिती ठेवली जाईल. तसेच थर्मल गनवरुन त्यांचे टेंम्परेचर तपासण्यात येणार असून त्यांचे स्वॅबही तपासणीसाठी घेण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. गावात आलेल्यांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी ग्रामपातळीवर कार्यरत ग्रामकृतीदलावर सोपवली आहे. त्यांच्या मदतीसाठी पोलिस मित्रांची नेमणूक करण्यात आली आहे. वाढत्या रुग्णांमुळे जिल्हा रेड झोनमध्ये गणला जाण्याची दाट शक्यता वर्तविली आहे; परंतु सध्या तसा समावेश केलेला नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट केले आहे. कोरोना बाधित रुग्णांच्या दुप्पट केसेस होत गेल्या तर रेड झोनमधील सुचनांचा अवलंब केला जाण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: लखनौला तिसरा धक्का, कर्णधार केएल राहुलपाठोपाठ दीपक हुड्डाही आऊट

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT