Fungal Infection On Braches Of Cashw Crop In Ratnagiri Marathi News 
कोकण

रत्नागिरीत काजू बागांवर फांदीमर 

सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी - वाढलेला पावसाचा हंगाम आणि बदलत्या वातावरणाचा फटका रत्नागिरी तालुक्‍यातील काजू बागांवर दिसू लागला आहे. बुरशीमुळे फांदीमर या रोगाची लागण मोठ्या प्रमाणात झाली आहे. शंभरहून अधिक एकर बागांवर त्याचा प्रादुर्भाव झाला आहे. टिमास्क्‍टिो व फुलकिडीचा आढळ होत असल्यामुळे नवीन पालवी पूर्ण सुकली आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होईल, अशी भिती काजू बागायतदारांनी व्यक्‍त केली आहे. 

बदलत्या वातावरणाचा फटका कोकणातील आंबा, काजू उत्पादनावर होत आहे. थंडी उशिरा सुरू झाल्यामुळे आंब्याबरोबर काजूला येणारा मोहोर लांबला. जानेवारी महिन्यात काही ठिकाणी बागा मोहोरलेल्या पाहायला मिळत आहे; परंतु या वातावरणामुळे काजूवर येणाऱ्या पालवीवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होत आहे.

रत्नागिरी तालुक्‍यात शेकडो एकर काजू बागांमध्ये फांदीमर होत असल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे येत होत्या. त्यानुसार तरवळ, आगवे, विल्ये, उक्षी येथील कृष्णा मालप, रमेश मालप, गुणाजी मालप, संतोष देसाई यांच्या बागांचे प्रादेशिक नारळ संशोधन केंद्रातील  किटकशास्त्रज्ञ डॉ. संतोष वानखेडे, तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे, मंडळ कृषी अधिकारी जयेश काळोखे, बापुराव शेंडगे, नितीन रांजण, रुपाली वायाळ यांच्यासह काजू बागांची पाहणी केली. त्या परिसरातील अनेक काजूच्या झाडांवर फांदीमर आढळून आले. पालवी सुकून गेल्यामुळे त्यावर मोहोर येणेच शक्‍य नसल्याचे दिसत आहे. त्याचा फटका उत्पादनावर होईल असे काजू बागायतदार कृष्णा मालप यांनी कृषी अधिकाऱ्यांना सांगितले. 

दरवर्षी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ओले काजूगर बाजारात विकण्यासाठी दाखल होतात. यंदा जानेवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यात ओल्या काजूगरांची विक्री सुरू झाली. ती ही एखाददुसऱ्या स्टॉलवर पाहायला मिळते. उत्पादनच कमी असल्यामुळे किलोला 2200 ते 2500 रुपये असा सोन्याचा दर मिळत आहे. वीस रुपयांना तिन काजूगर विकले जात असून खवय्यांची पंचाईत झाली आहे. 

या सुचनांचे पालन करा 

किटकशास्त्रज्ञ डॉ. वानखेडे यांनी फांदीमरची पाहणी केल्यानंतर त्यावर उपाययोजनाही सुचविल्या आहेत. लॅम्ब्डासायहॅलोथ्रिम 5 टक्के 6 मिली किंवा प्रोकेनोफॉस 50 टक्के 10 मिली तसेच फांदीमर शेंडेमर रोगांसाठी 1 टक्के बोर्डोमिश्रणाची किंवा कॉपरऑक्‍सी क्‍लोराईड 25 ग्रॅम 10 लिटर पाण्यामधून फवारणी करावी. तसेच फवारणीपूर्वी रोगग्रस्त पाने, फांद्या, शेंडे कापून जाळून नष्ट करावीत, अशा सूचना डॉ. वानखेडे यांनी दिल्या आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"भारताच्या भविष्यासाठी!" टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलची पोस्ट; इरफान पठाणही म्हणतो, कोणत्याही 'पेपर लीक'मुळे...

Paper Leak Fast-Track Courts: पेपरफुटीवर फास्ट ट्रॅक न्यायालयात सुनावणी; दोषींना कठोर शिक्षा होणार : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

Mumbai News: मोतीलाल नगर पुनर्विकासाची मालकी म्हाडाकडेच; अदाणी फक्त विकासक, म्हाडाचे स्पष्टीकरण

Pune Treefall : स्वारगेट पोलिस लाइनमध्ये वडाचे प्रचंड झाड कोसळून १०-१५ दुचाकींचे नुकसान, २३ दिवसांत शहरात ३७२ झाडपडीच्या घटना

Pune Dry Waste Project: पुण्यात ३०० मेट्रिक टन सुका कचरा प्रकल्पाला स्थायीत बहुमताने मंजुरी; भाजप-काँग्रेस आमनेसामने

SCROLL FOR NEXT