Kankavli Police Crime News esakal
कोकण

Kankavli Crime : धक्कादायक! ओळखीचा फायदा घेत दारू पाजून युवतीवर सामूहिक अत्याचार; तीन संशयितांना अटक

पीडित युवतीशी संशयित बाळकृष्ण याची ऑगस्ट २०२२ मध्ये ओळख झाली.

सकाळ डिजिटल टीम

शैलेश तांबे, बाळकृष्ण तांबे आणि गणेश गुरव यांनी आळीपाळीने बलात्कार केला.

कणकवली : ओळखीचा गैरफायदा घेत दोन मित्रांसह एकाने तरुणीला दारू (Alcohol) पाजून तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. ही घटना १५ ते १६ तारखेदरम्यान तालुक्यातील एका गावातील माळरानावर घडली.

या प्रकरणी कणकवली पोलिसांनी (Kankavli Police) बाळकृष्ण ऊर्फ बाळू सदानंद तांबे (वय २६, रा. नाद, बौद्धवाडी), शैलेश शांताराम तांबे (३४, रा. दारूम) आणि गणेश प्रकाश गुरव (२४, रा. शिरवली, देवगड) या तिघांना अटक केली आहे.

पीडित युवतीशी संशयित बाळकृष्ण याची ऑगस्ट २०२२ मध्ये ओळख झाली. पुढे ही ओळख घट्ट झाली. यातूनच १४ तारखेला पीडित युवती दुपारी एकच्या सुमारास तालुक्यातील एका गावात बाळकृष्ण याला भेटायला आली. दुपारी दोन वाजता ते दोघेही एस. टी. बसने देवगड येथे फिरण्यासाठी गेले. सायंकाळी सात वाजता ते परतले. यानंतर बाळकृष्ण याने आपल्या जवळच्या नातेवाईकाला फोन केला.

यात आपल्याला मैत्रिणीसह राहायची सोय हवी आहे. तिला घरी आणू का, अशी विचारणा केली. त्यावेळी त्या नातेवाईकाने तुम्हा दोघांची राहण्याची व्यवस्था इथे होणार नाही. इथे मुक्कामासाठी येऊ नका, असे स्पष्ट केले. त्यानंतर बाळकृष्ण याने आपल्या दुकान मालकाला फोन केला. आपल्या मैत्रिणीची एस.टी. चुकली आहे. त्यामुळे मुक्काम करण्यासाठी रूम मिळेल का, अशी विचारणा केली. त्यावेळी मालकाने आपल्याकडे रूम नाही; पण दुकानामध्ये जी केबिन आहे, तिथे व्यवस्था होते का पाहा, असे सांगितले.

त्यानंतर १४ ऑक्टोबरच्या रात्री पीडित युवती आणि बाळकृष्ण यांनी त्या केबिनमध्ये मुक्काम केला. १५ ऑक्टोबरला दुपारी बारापर्यंत तेथे वास्तव्य केल्यानंतर पीडित युवती आणि बाळकृष्ण आपल्या नातेवाईकांकडे गेले. त्यावेळी बाळकृष्ण याने त्या नातेवाईकाकडे पैशाची मागणी केली; मात्र त्यांनी आत्ता आपल्याकडे पैसे नाहीत, नंतर बघू या, मात्र आता तुम्ही आपल्या घरी जा, असे सांगून त्यांना पाठवून दिले.

सायंकाळी बाळकृष्ण हा युवतीला घेऊन पुन्हा त्या मूळ गावी आला. त्या युवतीला एका चायनीज सेंटरमध्ये बसवून तो काही वेळाने येतो, असे सांगून निघून गेला. बराच वेळ झाला तरी बाळकृष्ण न आल्याने युवतीने बसस्थानक गाठले. सायंकाळी तिने बाळकृष्ण याला फोन केला. त्या वेळी बाळकृष्ण याने आपण एका वाईन शॉपमध्ये दारू पीत असल्याचे सांगितले. त्या युवतीने शोधाशोध करून वाईन शॉप गाठले आणि बाळकृष्ण याला तेथून बाहेर आणले.

नंतर बाळकृष्ण आणि युवती जवळच्याच एका बसस्थानकात गेले. बसस्थानकावर युवतीला सोडून बाळकृष्ण पुन्हा निघून गेला आणि रात्री ७.४५ च्या सुमारास गणेश गुरव या रिक्षा व्यावसायिकाला घेऊन स्थानकात आला. बाळकृष्ण याने त्या युवतीला आपण सकाळी गेलो होतो, त्या नातेवाईकाच्या घरी जाऊया असे सांगितले. रिक्षाने येथे जात असताना वाटेत एका वाईन शॉपवर बाळकृष्ण याने रिक्षा थांबवली आणि पीडित युवतीला दुकानातून आणलेली वाईन प्यायला लावली. त्यानंतर रिक्षा दुसऱ्‍या एका गावाच्या दिशेने नेली. त्यावेळी संशय आल्याने युवतीने कुठे घेऊन चाललास, असे विचारले; मात्र बाळकृष्ण काहीच बोलत नव्हता.

दरम्यान, जवळच्या त्या गावच्या माळरानावर रिक्षा पोहोचल्यानंतर काही वेळाने दुसऱ्‍‍या रिक्षातून शैलेश तांबे त्या ठिकाणी आला आणि पीडित युवतीच्या जवळ बसला. या दरम्यान पीडित युवतीला धुंदी आली. त्याचा फायदा घेऊन शैलेश तांबे, बाळकृष्ण तांबे आणि गणेश गुरव यांनी आळीपाळीने बलात्कार केला. १६ ऑक्टोबरच्या पहाटे साडेपाच वाजता या तिघांनी आपल्याला घरी सोडले. तसेच झाल्या प्रकाराबाबत कुणाला काही सांगायचे नाही, अशी धमकी दिल्याचे पीडित युवतीने फिर्यादीत नमूद केले आहे.

दरम्यान, पीडित युवती घरी पोहोचल्यानंतर तिला त्रास होऊ लागला. त्यामुळे तिला तिच्या वडिलांनी कणकवली पोलिस ठाण्यात आणले. त्यानंतर झालेल्या प्रकाराबाबत पीडित युवतीने फिर्याद दिली. पोलिसांत तक्रार झाल्यानंतर तातडीने कार्यवाही करून कणकवली पोलिसांनी गुरुवारी (ता. १८) तिघा संशयित आरोपींना घरातून ताब्यात घेतले. या तिघांवर गुन्हे दाखल करून आज न्यायालयात हजर केले. या प्रकरणाच्या तपासकामी न्यायालयाने तिघांनाही २५ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोस अधिकारी किशोर सावंत, कणकवली पोलिस निरीक्षक अमित यादव करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT