Government Decision To Close International Education Affects Rural Students
Government Decision To Close International Education Affects Rural Students  
कोकण

शिक्षणाबाबतचा शासनाचा `हा` निर्णय आकसाने

सकाळवृत्तसेवा

गुहागर ( रत्नागिरी ) - शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण बोर्ड (एमआयइबी) बंद करण्याचा निर्णय आकस बुद्धीने घेतला आहे. परिणामी ग्रामीण भागातील गोरगरिबांच्या मुलांना आंतरराष्ट्रीय शिक्षणापासून वंचित राहावे लागणार आहे. त्यामुळे शासनाच्या या निर्णयाविरुद्ध महाराष्ट्रात रान पेटवू, असे प्रतिपादन अंजनवेलचे सरपंच यशवंत बाईत यांनी केले. या वेळी हा निर्णय रद्द करेपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय पालकांनी घेतला. 

तालुक्‍यातील अंजनवेल येथे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा आहे. या शाळेतील अभ्यासक्रम पूर्णपणे वेगळा आहे. त्यासाठी स्वतंत्र महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण बोर्डाची (एमआयइबी) स्थापना करण्यात आली आहे. या शाळेत पूर्व प्राथमिक वर्गात 125 व 1ली ते 3रीमध्ये 175 असे सुमारे 300 विद्यार्थी शिकतात. त्यापैकी सुमारे 150 विद्यार्थी हे तालुक्‍यातील आहेत. या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी शाळेने बससेवाही सुरू केली आहे. राज्याचे अधिवेशन सुरू झाल्यावर बुधवारी (ता. 26) एमआयइबी बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला. या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांसह पालकांनी शाळेसमोर निषेधाच्या घोषणा दिल्या. 

त्यावेळी पालकांना मार्गदर्शन करताना सरपंच यशवंत बाईत म्हणाले की, चार वर्षांपूर्वी युती शासनाने स्वतंत्र बोर्ड निर्माण करून महाराष्ट्रातील 81 जि. प. शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण सुरू केले.  या निर्णयात शिवसेनेचे मंत्रीही सामील होते.

राज्यसरकार जर आकसापोटी हा निर्णय घेत असेल तर दुर्दैव आहे. शिक्षणासारख्या क्षेत्रातील धोरण सत्ताधाऱ्यांप्रमाणे बदलू लागले तर विद्यार्थ्यांचे नुकसान होईल. त्यामुळे हा निर्णय सध्याच्या सरकारला मागे घेण्यास भाग पाडावे लागेल. हा प्रश्न केवळ अंजनवेलमधील शाळेपुरता मर्यादित नाही. राज्यातील 81 शाळांवर त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे राज्यव्यापी कृती समितीची स्थापना झाली आहे. या समितीच्यावतीने सरकारच्या धोरणाविरोधात न्यायालयीन लढा दिला जाणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT