Gram Panchayat Election Results Ratnagiri esakal
कोकण

Gram Panchayat Results : रत्नागिरीत अजितदादा, शिंदे गटाचं ग्रामपंचायतींवर वर्चस्व; संगमेश्वरात भाजपनं खोललं खातं

दापोलीत आमदार योगेश कदम यांचा करिष्मा कायम आहे.

सकाळ डिजिटल टीम

शरद पवार गटाचे चिपळुणातील नेते माजी आमदार रमेश कदम यांचे निकटवर्तीय किशोर कदम यांनी बाजी मारली.

रत्नागिरी : जिल्ह्यातील (Ratnagiri) दहा ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत (Gram Panchayat Election Results) राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) आणि शिंदे गटाचा वरचष्मा राहिला, तर संगमेश्वरमध्ये भाजपने खाते खोलले आहे. लांजा तालुक्यात पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या शिंदे गटाने (Shinde Group) ठाकरे गटाला (Thackeray Group) शह देत खाते उघडले; तर दापोलीत आमदार योगेश कदम यांचा करिष्मा कायम आहे.

जिल्ह्यात १६ ग्रामपंचायतींमधील सहा ठिकाणच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. त्यामुळे १० ग्रामपंचायतींत मतदान झाले. त्या ठिकाणी कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. उत्तर भागातील ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होती. कवडोली, मांदिवली, बांधतिवरे व डौली या चार ग्रामपंचायतींत स्थानिक आमदार योगेश कदम यांचा प्रभाव आहे. मंडणगडात दोन ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या.

उन्हवरेत गावपॅनेल विजयी झाले. दोन्ही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्‍यांनी त्यावर दावा केला आहे. वाल्मिकीनगर ग्रामपंचायतीवर अजित पवार गटाने दावा केला आहे. चिपळूण तालुक्यात अजितदादा गटाचे आमदार शेखर निकम यांना तीनही ग्रामपंचायतींवर वर्चस्व राखण्यात यश आले आहे. टेरवमध्ये किशोर कदम यांनी सरपंचपदी विजय मिळवला आहे. शरद पवार गटाचे चिपळुणातील नेते माजी आमदार रमेश कदम यांचे निकटवर्तीय किशोर कदम यांनी बाजी मारली. कालुस्ते खु. व कालुस्ते बु. या दोन्ही ग्रामपंचायतींवर आमदार निकम यांच्या सहकाऱ्‍यांनी वर्चस्व राखले.

संगमेश्वरमध्ये तळेकांटे ग्रामपंचायतीवर भाजपच्या सुषमा बने यांनी विजय मिळवला. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपने मारलेली मुसंडी लक्षवेधी ठरली आहे. लांजा तालुक्यातील दोन गावांतील पोटनिवडणुकीत शिंदे गटाने पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली ठाकरे गटाला धक्का दिला. राजापुरात पोटनिवडणुकीत ठाकरे गटाने वर्चस्व राखले. जुवे जैतापूर ही ग्रामपंचायत बिनविरोध झाली. या ग्रामपंचायतीवर आमदार राजन साळवी यांनी दावा केला आहे.

दृष्टीक्षेपात निकाल

  • टेरव ग्रामपंचायतीवर रयत पॅनेलचे वर्चस्व

  • मोसम येथे पार्वती सरवणकर विजयी

  • इसवली-पनोरे ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे वर्चस्व

  • तळेकांटे येथे सरपंचपदी सुषमा बने

  • उन्हवरे सरपंचपदी श्रीकृष्ण जोशी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Cyber Fraud: विधवेची सरकारी मदत सायबर भामट्याने लांबवली; सिम कार्डाच्या सहाय्याने खाते केले लिंक

Latest Marathi News Live Update : भारताच्या मीराबाई चानूनं रौप्य पदक पटकावलं

Beed News: पेट्रोलमध्ये आढळले पाणी; बीड शहरातील पंपावर नागरिक झाले संतप्त

RSS 100 Years : सोलापुरात २२७० स्वयंसेवकांचे पथसंचलन; अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी; राष्ट्रीय पंचसूत्रीची घोषणा

Pankaja Munde: पण, आमच्या लेकरांच्या ताटातले घेऊ नका;आरक्षणावरून पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांचे मत

SCROLL FOR NEXT