Ramdas Kadam vs Uddhav Thackeray esakal
कोकण

Ramdas Kadam : 'गीतेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून मी मुख्यमंत्री होऊ नये, म्हणून उद्धव ठाकरेंनी 2009 च्या निवडणुकीत मला पाडलं'

यापुढे गुहागर मतदारसंघावर भगवा फडकविल्याशिवाय गप्प बसणार नाही.

सकाळ डिजिटल टीम

'गतवेळच्या निवडणुकीत तटकरे दापोली आणि गुहागर मतदारसंघातून पिछाडीवर होते. त्यावेळी मी गीतेंसोबत होतो.'

खेड : गुहागर मतदारसंघातील कोणत्याही गावकऱ्यांला यापुढे विकास निधीसाठी कोणाच्याही घरी जाण्याची गरज नाही. त्यांच्या गावचा विकास करण्यासाठी मी सक्षम आहे. पन्नास कोटींचा निधी मी या साडेतीन जिल्हा परिषद गटांसाठी आत्तापर्यंत आणला आहे. यापुढे गुहागर मतदारसंघावर भगवा फडकविल्याशिवाय गप्प बसणार नाही, असे रोखठोक प्रतिपादन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम (ShivSena leader Ramdas Kadam) यांनी केले.

गतवेळच्या निवडणुकीत तटकरे दापोली आणि गुहागर मतदारसंघातून (Guhagar Constituency) पिछाडीवर होते. त्यावेळी मी गीतेंसोबत होतो. परंतु यावेळी मागची कसर सव्याज परतफेड करू, असेही त्यांनी स्पष्ट केले. गुहागर विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या लोटे येथे शिवसेना नेते रामदास कदम, खासदार सुनील तटकरे व प्रा. ज्योती वाघमारे यांची जाहीर सभा झाली. या वेळी सदानंद चव्हाण, बाबाजी जाधव, अरुण कदम, सुनील मोरे, अरविंद चव्हाण, सचिन धाडवे, शशिकांत चव्हाण आदी उपस्थित होते.

रामदास कदम म्हणाले, ‘माजी खासदार अनंत गीते यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मी राज्याच्या मुख्यमंत्री होऊ नये म्हणून उद्धव ठाकरे यांनी २००९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत मला पाडले. संपूर्ण राज्यात भाजपसोबत महायुती असताना विनय नातू यांनी माझ्या विरोधात निवडणूक लढवली. गीतेंच्या विजयामुळे त्यांना मंत्रिपद मिळाले. परंतु मला साहेबांनी (माझ्या शिवसेनाप्रमुखांनी) विधानपरिषदेवर घेतले. माझा पराभव झाल्यानंतर खेड तालुक्यातील साडेतीन गटाकडे माझे दुर्लक्ष झाले. हे मी कबूल करतो.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आंघोळीचा आनंद ठरला अखेरचा; वैनगंगा नदीत बुडून १५ वर्षांच्या मुलाचा मृत्यू, तर दोघे थोडक्यात बचावले, मकरसंक्रांतीला दुर्दैवी घटना

Pune Municipal Election : पुणे महापालिका निवडणुकीसाठी पोलिसांचा बंदोबस्त; १४ हजार जवानांचा खडा पहारा!

Ration Card : रेशन बंद होऊन थेट १००० रुपये खात्यात येणार; सोशल मीडियावरील 'त्या' व्हायरल दाव्याचे वास्तव काय?

Yerwada Bus Accident : सिग्नलवर थांबला अन् काळाने झडप घातली; भरधाव बसने दुचाकीला चिरडले; येरवड्यात भीषण अपघात!

Pune Cyber Fraud : कर्वेनगरमध्ये ज्येष्ठ नागरिकाला ५.६३ लाखांचा चुना; शेअर बाजारात गुंतवणुकीचे दाखवले आमिष!

SCROLL FOR NEXT