खेळाडुंना दर्जेदार सुविधा मिळाव्या, यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.
रत्नागिरी : अनेक दिवसांपासून रखडलेल्या जिल्हा क्रीडा संकुलाच्या (District Sports Complex) कामाला चालना मिळणार आहे. त्यासाठी 13 कोटी 77 लाखाचा जादा खर्चाचा प्रस्ताव (Proposal) आठवड्यात शासनाला सादर केला जाणार आहे. या प्रस्तावामध्ये सिंथेटिक ट्रॅक, टर्फ फुटबॉल ग्राउंड, मल्टिपर्पज हॉल, बॅडमिंटन कोर्ट, व्हियापी आणि साधे सुट असणार आहे. खेळाडुंना दर्जेदार सुविधा मिळाव्या, यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत (Higher and technical education minister uday samant) यांनी दिली. (Higher and technical education minister uday samant said a new proposal of Rs 13 crore for sports complex would be submitted to the government)
दुरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीनंतर ते बोलत होते. या बैठकीला क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड व संबंधित अधिकारी उपस्थित होते. उदय सामत क्रीडा मंत्री असताना त्यांनी जिल्ह्यात तालुका क्रीडा संकुलासह जिल्ह्यात मोठे जिल्हा क्रीडा संकुल मंजूर करून आणले होते. एमआयडीसीत त्याचे काम सुरू झाले. सुमारे 8 कोटी रुपये त्यावर खर्च झाले आहे. त्यामध्ये संरक्षक भिंत आणि कार्यालयाचेच काम झाले आहे. निधी नसल्याने हे काम काही वर्षे रखडले होते. त्या अनुषंगाने उदय सामंत यांनी पुढाकार घेऊन बैठक घेतली. त्यामध्ये काही महत्त्वाचे निर्णय त्यांनी घेतले.
पुढे सामंत म्हणाले, मी क्रीडा मंत्री असताना जिल्हा क्रीडा संकुल मंजूर केले होते. त्यावर आठ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. निधी नसल्याने त्याचा जादा खर्चाचा 13 कोटी 77 लाखाचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यामध्ये सिंथेटिक ट्रॅक, टर्फ फुटबॉल ग्राऊंड, मल्टीपर्पज हॉल, दोन बॅडमिंटन कोर्ट, 5 व्हीआयपी सूट, 10 साधे सूट, कंपाऊड, गेट आदीचा समावेश आहे.
प्रस्ताव सोमवारपर्यंत शासनाकडे येणार आहे. येत्या आठवडा भरात तो प्रस्ताव शासनाला सादर केला जाईल. जिल्ह्यातील खेळाडूंना दर्जेदार सुविधा मिळून चांगले खेळाडू निर्माण व्हावे, या उद्देशाने या प्रकल्पाला चालना दिली जात आहे.
(Higher and technical education minister uday samant said a new proposal of Rs 13 crore for sports complex would be submitted to the government)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.