Vaccination
Vaccination Sakal
कोकण

रत्नागिरीमध्ये सात लाख ९१ हजार जण जिल्ह्यात लसवंत

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : कोरोना प्रतिबंधित लसीकरण मोहिमेला रत्नागिरी जिल्ह्यात(vaccination in ratnagiri district) चांगला प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत पहिली मात्रा घेणाऱ्यांचे प्रमाण ९६.३६ टक्के असले तरीही १८ ते ४४ वयोगटातील ७४ टक्केच लोकांचा प्रतिसाद मिळाला. उर्वरित सर्व गटातील लोकांचे लसीकरण (vaccination)योग्य पद्धतीने सुरू आहे. दुसरी मात्रा घेणाऱ्‍यांचा टक्का ७३.२० असून, दोन मात्रा घेतलेले जिल्ह्यातील सात लाख ९१ हजार ९०० जण लसवंत झाले.

कोरोनाची तिसरी लाट (third wave of corona)वेगाने पसरत असून त्याला प्रतिबंध घालण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाची तीव्रता कमी करण्यासाठी राज्य शासनाकडून लसीकरण मोहिमेवर अधिक भर दिला आहे. राज्य शासनाकडून घेण्यात आलेल्या आढाव्यात ग्रामीण भागातील लसवंतांचे प्रमाण कमी असल्याचे दिसते. रत्नागिरी जिल्ह्यात परिस्थिती चांगली आहे. लसीकरणासाठी पात्र ठरलेल्यांची संख्या १० लाख ८१ हजार ९०० होती.

त्यातील १० लाख ४२ हजार ५१८ जणांनी पहिली मात्रा घेतली असून दुसरी मात्रा घेणाऱ्‍यांची संख्या ७ लाख ९१ हजार ९०० आहे. पहिला मात्रा घेणाऱ्‍यांमध्ये फ्रंट वर्कर, आरोग्य यंत्रणा यांच्यासह ४५ ते ५९ वयोगट आणि ६० वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण शंभर टक्केहून अधिक झाले आहे; मात्र पहिली मात्रा न घेणाऱ्‍यांमध्ये १८ ते ४४ वयोगटातील लोकांचा समावेश जास्त आहे. या वयोगटातील ६ लाख ६५ हजार ९०० जणं पात्र असून त्यातील ४ लाख ८७ हजार ३४६ जणांनी पहिली मात्रा तर ३ लाख ४७ हजार ३४७ जणांनी दुसरी मात्रा घेतली आहे.

मुलांच्या लसीकरणाला चांगला प्रतिसाद

जिल्ह्यात बूस्टर डोस(vaccine booster dose) घेण्यासाठी ३४ हजार ४२९ जण पात्र असून, आतापर्यंत सहा हजार १७६ जणांनी लाभ घेतला आहे. तसेच, १५ ते १७ वयोगटातील ७१ हजार ७४४ जणांना पहिला डोस देण्यात येईल. आतापर्यंत ४३ हजार ३२० मुलांनी पहिला डोस(first dose of vaccine) घेतला असून, हे प्रमाण ६०.३८ टक्के आहे.

  1. बूस्टर डोस घेण्यासाठी पात्र -३४, ४२९

  2. १५ ते १७ वयोगटाला पहिला डोस देणार - ७१, ७४४

  3. मुलांनी पहिला डोस घेतला - ४३, ३२०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: 'काँग्रेसने महाराष्ट्रात का नाही दिला एकही मुस्लिम उमेदवार...', नसीम खान यांचा सवाल

'माझ्यासोबत राहा अन् मुलांना जन्म दे', दहशतवाद्यानं अंगठी देत केलं प्रपोज, हमासच्या कैदेतील तरुणीची आपबीती

Latest Marathi News Live Update: आम्ही काम करतो, इतरांसारख खोट बोलत नाही, अजित पवारांची सुप्रिया सुळेंवर टीका

Lok Sabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सुट्टी देणे बंधनकारक आहे का? काय सांगतो कायदा

Maharashtra Din 2024 : वर्ल्ड फेमस आहेत महाराष्ट्रातील 'हे' खास पदार्थ, एकदा चव चाखाल तर प्रेमात पडाल.!

SCROLL FOR NEXT