Indian Postal Department In The fFagging Of Ratnagiri Kokan Marthi News ...
Indian Postal Department In The fFagging Of Ratnagiri Kokan Marthi News ... 
कोकण

Republic Day 2020 : रत्नागिरीत ध्वजारोहणात भारतीय डाक खात्याचा चित्ररथ....

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : प्रजासत्ताक दिनादिवशी रत्नागिरीत छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममध्ये होणाऱ्या मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमात २६ रोजी भारतीय डाक खात्याचा चित्ररथ समाविष्ट होणार आहे. डाक विभागाच्या विविध योजनांची माहिती रथाद्वारे दिली जाईल, असे डाकघर अधीक्षक आबा कोड्डा 
यांनी सांगितले.

भारतीय डाक विभागाची स्थापना झाल्यानंतर आजतागायत विविध योजना या विभागाकडून राबवण्यात येत आहेत. शहरातूनही डाक खात्याच्या विविध योजनांना प्रतिसाद लाभत आहे.  नवनवीन योजना या विभागाकडून राबवल्या जात आहेत. या योजनांची माहिती २६ जानेवारी रोजी चित्ररथातून दाखवली जाणार आहे.


कोणत्याही कागदपत्राशिवाय २ मिनिटात आता बॅंक खाते सुरू करता येणार आहे. खात्यामध्ये शिलकीची मर्यादा नाही. 
मातृवंदना योजना, जननी सुरक्षा योजना, किसान सन्मान, गॅस सबसीडी, संजय गांधी पेन्शन योजना याशिवाय राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनांसाठी ही खाती आवश्‍यक असतात.

स्कॉलरशिप खाती, लाईट बिल स्वीकारणे, चेक जमा सुविधा, इतर बॅंकिंग सुविधा, वेगवेगळे इन्शुरन्स, पोस्टाच्या आरडी, सुकन्या समृद्धी योजना, पीपीएफ यासारखे उपक्रम जनतेच्या पसंतीस उतरत आहेत. या योजनांची जनजागृती करण्यासाठी रत्नागिरी डाक विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. मुख्य डाकघर अधीक्षक आबा कोड्डा यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यादृष्टीने तसे नियोजन केले जात आहे. या उपक्रमात डाक विभागाचे कर्मचारीही सहभागी होणार आहेत. हा चित्ररथ आकर्षक व्हावा, त्याचे प्रभावी सादरीकरण केले जावे, यासाठी कर्मचारीही मेहनत घेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT