कोकण

फिशमिल जीएसटीवर गोव्यातील बैठकीत होणार निर्णय 

सकाळ वृत्तसेवा

मालवण - गोव्यात 19, 20 सप्टेंबरला होणाऱ्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत विविध राज्यांच्या अर्थमंत्र्यांशी चर्चा करून फिशमिल धारकांना भेडसावत असलेली जीएसटीची समस्या दूर करण्यासाठी योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज स्पष्ट केले. त्यांनी दिलेल्या आश्‍वासनामुळे देशभरातील फिशमिलधारकांनी आज आपले आंदोलन मागे घेतले असून, उद्यापासून ते मासळी खरेदी करणार आहेत, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 

मच्छीमारांची मासळी खरेदी करणाऱ्या फिशमिलधारकांना केंद्र शासनाने मागील तीन वर्षांची जीएसटी भरण्याच्या नोटिसा बजावल्या. प्रत्यक्षात मागील तीन वर्षांची जीएसटी भरणे शक्‍य नसल्याने देशभरातील सुमारे 56 फिशमिलधारकांनी गेले महिनाभर आपल्या फिशमिल बंद ठेवून आंदोलन छेडले.

मच्छीमार हंगाम सुरू झाल्यानंतर पारंपरिक मच्छीमारांना मोठ्या प्रमाणात मासळी मिळूनही त्याची खरेदी फिशमिलकडून होत नसल्याने त्यांना मासळी किनाऱ्यावरच फेकून द्यावी लागत होती. या पार्श्‍वभूमीवर भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आज दिल्ली येथे संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेत फिशमिलधारकांना जीएसटीच्या भेडसावत असलेल्या समस्येकडे लक्ष वेधले.

यावेळी देशभरातील 56 फिशमिलधारकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत श्रीमती सीतारामन यांनी 19, 20 सप्टेंबरला गोव्यात जीएसटी कौन्सिलची बैठक बोलाविण्यात आली आहे. या बैठकीस विविध राज्यांचे अर्थमंत्री उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे सर्व अर्थमंत्र्यांशी या समस्येसंदर्भात चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्‍वासित केले. त्यामुळे फिशमिलधारकांनी आजपासून आपले आंदोलन मागे घ्यावे, असे स्पष्ट केले. देशभरातील फिशमिलधारकांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे. सिंधुदुर्ग, महाराष्ट्र तसेच देशभरात अशा एकूण 56 फिशमिलधारकांनी आंदोलन मागे घेतले असून, ते उद्यापासून मच्छीमारांची मासळी खरेदी करणार आहेत. 

जीएसटीमुळे फिशमिलधारकांनी आपल्या फिशमिल बंद ठेवल्या होत्या. ही समस्या सोडविण्यासाठी फिशमिलधारकांचे नेतृत्व करण्याची संधी आपल्याला मिळाली. त्यानुसार आज देशाच्या संरक्षणमंत्र्यांची भेट घेत या प्रश्‍नासंदर्भात चर्चा करण्यात आली आहे. श्रीमती सीतारामन यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्‍वासन दिल्याने फिशमिलधारकांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे. उद्यापासून जिल्ह्यातील फिशमिलधारकांकडून मासळीची खरेदी केली जाणार आहे. हा प्रश्‍न मार्गी लागल्याने पारंपरिक मच्छीमारांनाही न्याय मिळाला असल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष श्री. जठार यांनी स्पष्ट केले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT