कोकण

सर्वसामान्यांना बसतेय 'कर्फ्यू'ची झळ; कणकवलीतील परिस्थिती

तालुक्यातील नागरिकांना लॉकडाउनमध्ये हवी शिथिलता

सकाळ वृत्तसेवा

कणकवली : तालुक्‍यातील कोरोनाव्हायरसचा (covid-19) प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी १ ते १० मे या कालावधीत जनता कर्फ्यू (curfew) लावण्यात आला. संपूर्ण कणकवली तालुक्‍यात (kankavli district) हा जनता कर्फ्यू योग्य पध्दतीने पाळण्यात आला. मात्र आता जिल्हाधिकाऱ्यांनी (collector) १५ मेपर्यंत संपूर्ण जिल्हात लॉकडाऊन (lockdown) जाहीर केल्याने नागरिकांच्या अडचणीत वाढ होणार आहे. तालुक्‍यातील ग्रामीण भागातील (villege area) जनता जीवनाश्‍यक वस्तू मिळत नसल्याने त्यांची हेळसांड होऊ लागल्या आहे. त्यामुळे कणकवली बाजारपेठेमध्ये नियोजन तालुक्‍यातील बाजारपेठाना ही या लॉकडाऊनमध्ये शिथिलीत आवश्‍यक आहे.

कणकवली तालुक्‍यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवू जनता कर्फ्यू जाहीर केला. तहसीलदार, नगरपंचायत, सर्वपक्षीय पदाधिकारी यांनी एक निर्णय घेऊन १ ते १० मे जनता कर्फ्यू जाहीर केला. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. मात्र, ऐनवेळी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा लॉकडाऊन १५ मेपर्यत जाहीर केल्यामुळे कणकवलीची जनता अडचणीत आली आहे. एक तर संपूर्ण बंदमुळे जीवनावश्‍यक वस्तू खरेदी करण्यासाठी मोठ्या अडचणी येत आहे. ग्रामीण भागातील खारेपाटण, तळेरे, फोंडाघाट, नांदगाव, कनेडी या प्रमुख बाजारपेठांमधील दुकाने बंद आहेत.

आता, उन्हाळा संपून पावसाळा तोंडावर आला आहे. त्यामुळे अनेक नागरिक खरेदीसाठी बाजारात येऊ लागले आहेत. मात्र, पुढील १५ मे पर्यंत लॉकडाऊन आहे. राज्य शासन ३० मे पर्यंत पुढे लॉकडाऊन वाढण्याची शक्‍यताही नाकारता येत नाही. त्यामुळे महिनाभर तालुक्‍यातील जनतेवर उपासमारीची वेळ येण्याची शक्‍यता आहे. याचा विचार करून कणकवली तालुक्‍यासाठी जिल्हा प्रशासनाने थोड्याफार प्रमाणात शिथिलता देणे अपेक्षित आहे.

घर दुरुस्ती रखडली

उन्हाळी हंगामात घर दुरुस्तीची कामे मोठ्या प्रमाणात केली जातत. नव्याने बांधकाम केलेल्या घरांचे काम उरकण्याचा हाच हंगाम असतो. मात्र, या हंगामात बांधकामासाठी लागणारे साहित्य उपलब्ध होत नसल्याने अनेक अडचणी येऊ लागल्या आहेत. तोंडावर पाऊस आला असून घर दुरुस्ती न केल्यास सर्वसामान्य गरीब कुटुंबांना पावसाळ्यात राहायचे कसे असा प्रश्‍न पडला आहे.

बेगमीच्या वस्तू महागल्या

कोकणात चार महिने तीव्र पावसाळा असल्याने कांदा, बटाटा, मसाला, मीठ व अन्य वस्तू किमान तीन ते चार महिने पुरतील अशा बेगमी केल्या जातात. बहुतांशी वाड्या-वस्त्या ह्या मोठ्या नदी-नाल्यांच्या पलीकडे असतात. त्यामुळे पावसाळ्यात अशा नदी-नाल्यांना वरून प्रवास करणे जोखमीचे असते, त्यामुळे पावसाळ्याच्या कालावधीत जीवनावश्‍यक वस्तूंचा साठा करण्याची प्रथा अनेक वर्ष आहे. बाजापेठा बंद असल्याने बेगमी करायची कशी अशी अडचण वाढली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi’s Mission Book: ‘मोदीज मिशन’ पुस्तकात नरेंद्र मोदींचा प्रवास उलगडणार! देवेंद्र फडणवीस मोठी भूमिका बजावणार; प्रकाशन सोहळा कधी?

Uttrakhand Tourism : सुरखाब या परदेशी पक्षाच्या आगमनाने उत्तराखंडमधील पर्यटक भारावले, पक्षी पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

रीलसाठी तोंडात पेटवले 8 सुतळी बॉम्ब, 7 नीट फुटले पण शेवटच्या बॉम्बचा तोंडात स्फोट, जबडा तुटून बाहेर

Latest Marathi News Live Update : मुलुंड ऐरोली ब्रिजवर भीषण अपघात, बस आणि टेम्पोमध्ये धडक

Madhya Pradesh :  ‘संडे हो या मंडे’ काही फायद्याचं नाही; गायीचं दुध हेच खरं रोगांशी लढण्याचं सुरक्षा कवच : CM मोहन यादव

SCROLL FOR NEXT