खोपोली : दुर्घटनाग्रस्त कंपनी आणि आजुबाजूच्या कंपन्यांची खासदार श्रीरंग बारणे यांनी पाहणी केली.  
कोकण

खोपोलीतील जष्णोवा स्फोटप्रकरण : खासदार श्रीरंग बारणे यांचे दोषींवर कारवाईचे निर्देश

अनिल पाटील

खोपोली : खोपोली परिसरातील साजगाव-ढेकू औद्योगिक वसाहतमधील कंपनीत गुरुवारी भीषण स्फोट होऊन दोन जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनास्थळाची खासदार श्रीरंग बारणे यांनी शुक्रवारी (ता. 6) पाहणी करत दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. या वेळी त्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांसमवेत बाधित कंपनी, शेजारील अन्य कंपन्यांची पाहणी करत मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांचीही भेट घेतली. 

खोपोलीजवळील साजगांव-ढेकू औद्योगिक वसाहतीतील आरकोस इंडस्ट्रीयल इस्टेटमधील मे. जष्णोवा फार्मसिटीकल्स कंपनीत गुरुवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. आगीनंतर कंपनीत मोठमोठे स्फोट झाले होते. यात शेजारील वसाहतीतील एक महिला व कंपनीतील एक पुरुष कामगार असे दोघांचे मृत्यू झाले. या आगीमुळे शेजारील अन्य चार कंपन्यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर खासदार बारणे यांनी दुर्घटनास्थळाची आज सकाळी पाहणी केली. 

त्यानंतर त्यांनी मृत्यू झालेल्या नातेवाईकांची भेट घेतली. भेटीदरम्यान त्यांनी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना विशेष शासकीय योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत देणार असल्याचे सांगितले. पुढे त्यांनी दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश देत नुकसान झालेल्या अन्य कारखानदारांना नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. 

भविष्यात अशी घटना होऊ नये म्हणून, संबंधित सर्व यंत्रणांची बैठक घेण्यात येणार आहे. त्यानंतर उपाययोजनांमध्ये तातडीने सुधारणा करण्यात येतील. 
श्रीरंग बारणे, खासदार 

(संपादन : उमा शिंदे)
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT