Anuskara Ghat Karul Ghat esakal
कोकण

प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! करूळ घाटमार्ग 'इतके' दिवस बंद राहण्याची शक्यता; 'या' महामार्गावरुन वळवणार वाहतूक

तळेरे-कोल्हापूर महामार्ग (Talere-Kolhapur Highway) काँक्रिटपासून करण्याचा पहिला आणि दुसरा सुरू झाले आहे.

सकाळ डिजिटल टीम

दुसऱ्या टप्प्यात तळेरे-गगनबावडा मार्गावरील २१ किलोमीटर रस्त्यासाठी जानेवारी २०२३ मध्ये मंजुरी मिळाली होती.

वैभववाडी : काँक्रिटीकरणाच्या कामासाठी करूळ घाटमार्ग (Karul Ghat) सोमवारपासून (ता. १५) बंद करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. या महामार्गावरील अवजड वाहतूक फोंडा आणि अणुस्करा घाटमार्गे (Anuskara Ghat) करण्याचे नियोजन असून हा मार्ग ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यास जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगी मिळण्याची शक्यता आहे. भुईबावडा घाटमार्गे केवळ प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी मिळणार आहे.

तळेरे-कोल्हापूर महामार्ग (Talere-Kolhapur Highway) काँक्रिटपासून करण्याचा पहिला आणि दुसरा सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यात कळे ते कोल्हापूर या १८ किलोमीटरसाठी १७१ कोटी रुपये मंजूर होते. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात तळेरे-गगनबावडा मार्गावरील २१ किलोमीटर रस्त्यासाठी जानेवारी २०२३ मध्ये मंजुरी मिळाली होती. यातील १६ किलोमीटरचा रस्ता सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर पाच किलोमीटर गगनबावडा तालुक्यात आहे.

जिल्ह्यातील १६ पैकी साडेनऊ किलोमीटर करूळ घाटररस्ता काँक्रिटपासून होणार आहे. त्याची रुंदी १० मीटर आहे. घाटात अरूंद ठिकाणी महिनाभरापासून दरडी तोडून रूंदी वाढविण्याचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. पुढील टप्प्यात घाटरस्त्यांमध्ये मोरी बांधकाम होणार आहे. त्यामुळे महामार्ग बंद ठेवल्याशिवाय रस्ता खोदाई शक्य नसल्याने महामार्ग प्राधिकरणने रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितली होती.

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात परवानगी मिळेल, अशी अपेक्षा होती; परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यामुळे परवानगी मिळाली नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर पुन्हा एकदा प्राधिकरणाने परवानगी मागितली आहे. सोबत पोलिस विभागाचा अहवाल दिला आहे.

मोऱ्यांचे बांधकाम करण्यासाठी घाटरस्ता खोदाई आणि इतर कामे आवश्यक आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडून करूळ घाट बंद ठेवण्यासाठी परवानगी मागितली आहे. सोमवार किंवा मंगळवारपर्यत परवानगी मिळेल, अशी अपेक्षा आहे.

-अतुल शिवनिवार, उपअभियंता, महामार्ग प्राधिकरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Heavy Rain : पुणेकर त्रस्त; यंत्रणा मात्र सुस्त, आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेला उशिरा जाग

LPG import updates: 'एलपीजी'बाबत सरकारने प्लॅन बदलला! अमेरिकेसोबत मोठा निर्णय, गॅसचं संकट टळणार

Pune Heavy Rain : पावसाने दाणादाण! जनजीवन विस्कळित, घरांसह दुकानांमध्ये शिरले पाणी

Davadi News : रेटवडी येथील तरुण ओढ्यात दुचाकीसह वाहून बेपत्ता

विद्यापीठातील पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मारकाचा निधी संपला! विद्यापीठ शासनाला पाठविणार सुधारित अंदाजपत्रक; पुतळ्याचे तोंड उत्तरेकडे नको, पूर्वकडे करण्याची नवी मागणी

SCROLL FOR NEXT