Konkan Rain Sindhudurg Meteorology Department esakal
कोकण

Konkan Rain : कोकण किनारपट्टी भागात पुढील तीन-चार दिवस पावसाचा जोर वाढणार; हवामान विभागानं वर्तवला अंदाज

सध्या पाऊस आणि वारा यामुळे छोट्या मच्छीमारी नौका बंदरात थांबून आहेत.

सकाळ डिजिटल टीम

कोकण किनारपट्टीला निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव पुढील दोन तीन दिवस राहण्याचा अंदाज आहे.

वैभववाडी/देवगड : अरबी समुद्राच्या कोकण किनारपट्टी भागात (Konkan Rain) कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे पावसाचा जोर वाढला आहे. किनारपट्टीसह जिल्ह्याच्या काही भागाला पावसाने झोडपून काढले असून, वाऱ्‍याचा वेग देखील वाढला आहे.

हवेत प्रचंड गारवाही आहे. समुद्रात वादळी वारे वाहू लागल्याने देवगड बंदरात शेकडो मच्छीमार नौका आश्रयासाठी दाखल झाल्या आहेत. दरम्यान, कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव पुढील तीन-चार दिवस राहण्याचा अंदाज हवामान विभागाकडून (Meteorology Department) देण्यात आला आहे.

अरबी समुद्राच्या कोकण किनारपट्टी भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्याचा प्रभाव सध्या किनारपट्टीसह जिल्ह्याच्या उर्वरित भागात जाणवत आहे. गुरुवार (ता. २८) रात्रीपासूनच जिल्ह्यातील मालवण, वेंगुर्ले आणि देवगड किनारपट्टीत जोरदार पावसाला सुरुवात झाली. वेगवान वाऱ्‍यामुळे पडझडीचे प्रकार घडले आहेत. सावंतवाडी, कुडाळ तालुक्यांमध्ये सकाळपासून पाऊस पडत होता.

वैभववाडी आणि कणकवली तालुक्यात ढगाळ वातावरण होते; मात्र सायंकाळी चार - पाचनंतर देखील दमदार पावसाला सुरुवात झाली. डाळ तालुक्यातील डिगस येथे घरावर झाड कोसळून नुकसान झाले. किनारपट्टीच्या तालुक्यांमध्ये काही ठिकाणी पडझडीमुळे नुकसान झाले आहे.

समुद्रातील खराब वातावरण, बदलते वारे, किनारपट्टीवर सुटलेला वारा आणि संभाव्य वादळी पावसाची शक्यता या पार्श्वभूमीवर येथील सर्वार्थाने सुरक्षित मानल्या जाणाऱ्‍या बंदरात स्थानिकसह परराज्यातील मच्छीमारी नौका कालपासून आश्रयाला येत आहेत. त्यात आज आणखी वाढ झाली. वातावरण पूर्णपणे निवळेपर्यंत नौका बंदरात थांबून असतील. आजपर्यंत (ता. ३०) वातावरण कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

खरंतर एक ऑगस्टपासून मासेमारीच्या हंगामाची सुरुवात झाली. काही मच्छीमार नारळी पौर्णिमेनंतर तर काही गणेशोत्सवानंतरच हंगामाची सुरुवात करतात. आता गणपती विसर्जन झाले आहे. त्यामुळे पावसाचा अंदाज घेत मासेमारी हंगाम जोरास येईल; परंतु सध्या पावसाने जोर धरला आहे.

सध्याच्या पावसाचा भातपिकावर अजून फारसा परिणाम झालेला नसला तरी जोर कायम राहिल्यास परिपक्व भातपिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. कातळावरील भातशेती आता तयार होत आहे; मात्र गणेशोत्सवामुळे भात कापणी सुरू झाली नव्हती. आता गणपती विसर्जन झाल्याने भातकापणी केली जाणार होती. मात्र, पावसाने जोर धरल्याने कापणी लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. भात कापणीवेळी पाऊस झाल्यास नुकसानीची भीती होती.

कोकण किनारपट्टीत जोर वाढणार

कोकण किनारपट्टीला निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव पुढील दोन तीन दिवस राहण्याचा अंदाज आहे. आज (ता. ३०) जोरदार पावसाचा अंदाज आहे. वाऱ्‍याचा वेग देखील वाढण्याची शक्यता आहे. विजांचा लखलखाट होईल, असा देखील अंदाज हवामान विभागाने दिला आहे. राजस्थानमधून २५ सप्टेंबरपासून मॉन्सून मागे फिरल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे येथे पडत असलेला पाऊस परतीचाच मानला जात आहे.

माशांची आवक मंदावली

सध्या पाऊस आणि वारा यामुळे छोट्या मच्छीमारी नौका बंदरात थांबून आहेत. समुद्रातील वातावरण खराब असल्याने मोठ्या नौकाही परतत आहेत. अन्य राज्यातील नौका बंदरात आल्याने बंदर भरून गेले आहे. गणेशोत्सवानंतर खवय्यांची धाव मासळी बाजाराकडे असते. आज मांसाहाराचा दिवस असल्याने अनेकांनी मासळी खरेदीकडे मोर्चा वळवला होता; मात्र पावसामुळे तुलनेत माशांची आवक मंदावली होती. वातावरण असेच कायम राहिल्यास आणखी दोन दिवस मासेमारी अनियमित राहील, अशी शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pak Rapper Indian Flag : पाक रॅपरने शो मध्ये फडकवला 'तिरंगा'! पाकिस्तानात संतापाची लाट, व्हिडिओ व्हायरल, काय घडलं नेमकं?

WPL 2026 Date: मोठी बातमी! महिला प्रीमियर लीग २०२६ कधीपासून सुरू होणार? तारीख आली समोर

नॅशनल क्रश झाल्यानंतर दोन दिवसात गिरीजा ओकचे किती फॉलोवर्स वाढले? आकडा वाचून भुवया उंचावतील

१० वी पास...१० वर्षांचा प्रिटिंगचा अनुभव...YouTube बघून तयार केल्या बनावट नोटा अन्...; पठ्ठ्याची करामत वाचून व्हाल थक्क

Mumbai News: मुंबईला जागतिक दर्जाचे टनेल मत्स्यालय मिळणार! कुठे अन् कधी पूर्ण होणार? बीएमसीने संपूर्ण योजना सांगितली

SCROLL FOR NEXT