कोकण

कोकण पर्यटन व्यावसायिक महासंघ यासाठीच लढणार विधानसभा

सकाळ वृत्तसेवा

मालवण - सत्ताधारी पालकमंत्री, आमदार, खासदारांनी पर्यटन व्यावसायिकांना सातत्याने उपेक्षित ठेवण्याचे काम केले आहे. गेल्या पाच वर्षात पर्यटन व्यावसायिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्याने त्यांच्या समस्या अद्यापही प्रलंबित राहिल्या आहेत. त्यामुळे समृद्ध कोकण व कोकण पर्यटन व्यावसायिक महासंघातर्फे येत्या विधानसभा निवडणुकीत कुडाळ - मालवण मतदार संघातून पर्यटन व्यवसायाशी निगडित उमेदवार उभा करण्यात येणार आहे, अशी माहिती कोकण पर्यटन व्यावसायिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष अवी सामंत यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. 

हॉटेल कोणार्क येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी सहदेव साळगावकर, शिवा माडये, बाळू वायंगणकर, मिलिंद झाड, गौरी सातार्डेकर, प्रदीप गावकर, महेश चोपडेकर आदी व्यावसायिक उपस्थित होते. श्री. सामंत म्हणाले, महाराष्ट्राच्या पर्यटन व्यवसायात तारकर्ली व देवबाग या गावांचे योगदान महत्त्वाचे आहे. मात्र पर्यटन विकास महामंडळाकडून तारकर्ली, देवबागमधील पर्यटन व्यावसायिकांवर सातत्याने अन्याय करण्याचे काम होत आहे. निवास न्याहारी योजनेचे अनेक प्रस्ताव पर्यटन विकास महामंडळाकडे प्रलंबित आहेत.

तारकर्ली, देवबागमधील निवास न्याहारी पर्यटन विकास महामंडळाशी संलग्न आहेत. पर्यटन केंद्रातील निवासाची व्यवस्था फुल झाल्यानंतर त्यांनी ते ग्राहक या निवास न्याहारी धारकांकडे पाठविणे आवश्यक आहे. मात्र असे कोणतेही ग्राहक त्यांच्याकडून पाठविले जात नाहीत. मग पर्यटन विकास महामंडळ आमच्याकडून पाच हजार रुपये का घेते असा प्रश्‍नही यावेळी उपस्थित करण्यात आला. पर्यटन दिनाच्या कार्यक्रमाचे शुल्कही पर्यटन विकास महामंडळ जर घेत असेल तर त्यांच्याकडून सहकार्याची कोणती अपेक्षा करायची?

सत्ताधार्‍यांनाही गेल्या पाच वर्षाच्या काळात पर्यटन व्यावसायिकांचे प्रश्‍न सोडविण्यात अपयश आले आहे. 
पर्यटन व्यावसायिकांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. या समस्या सोडविण्यासाठी पर्यटन व्यावसायिकांच्या समस्यांची जाण असलेल्या व्यक्तीची आवश्यकता आहे. यादृष्टीकोनातूनच समृद्ध कोकण व कोकण पर्यटन व्यावसायिक महासंघाच्यावतीने येत्या निवडणुकीत कुडाळ - मालवण मतदार संघातून उमेदवार उभा केला जाणार आहे. येत्या दोन दिवसात उमेदवार जाहीर केला जाईल. हा उमेदवार पर्यटन व्यवसायाशी निगडितच असेल असेही श्री. सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT