कोकण

सह्याद्री रांगेतील गावांची स्थिती गंभीर; डोंगरांना गेल्या भेगा

पायथ्याशी असलेल्या गावांच्या स्थलांतराचा प्रश्‍न महत्त्वाचा ठरणार आहे.

राजेश कळंबटे

रत्नागिरी : सह्याद्रीच्या रांगांमध्ये (sahyadri) वसलेल्या गावांमधील परिस्थिती गंभीर आहे. अति पावसामुळे डोंगरांना भेगा गेल्या असून भविष्यात भूस्खलनाची (landslide) भीती आहे. त्यामुळे पायथ्याशी असलेल्या गावांच्या स्थलांतराचा प्रश्‍न महत्त्वाचा ठरणार आहे. पोसरेत डोंगरमाथ्यावर भेगा गेल्या आहेत, तर येगाव, तिवरे भागातील परिस्थिती गंभीर आहे, अशी माहिती जिल्हा परिषद उपाध्यक्ष उदय बने यांनी भागाचा दौरा केल्यानंतर 'सकाळ'ला दिली.

प्रमाणापेक्षा अधिक पडलेला पाऊस, भरतीची वेळ आणि कोळकेवाडी प्रकल्पातून सोडलेले पाणी यामुळे वाशिष्ठी नदीपात्र (vashishthi river) सोडून वाहू लागली. या वेळी निर्माण झालेल्या जलप्रलयाने वाशिष्ठी किनाऱ्यावरील बारा गावांना मोठा फटका बसला. सह्याद्रीच्या रांगातील अनेक दुर्गम गावात दरडी कोसळल्या, रस्ते खचले. परिस्थिती निवळल्यानंतर गेले चार दिवस जिल्हा परिषद उपाध्यक्ष उदय बने यांनी स्थानिक सदस्य आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन प्रतिकूल परिस्थितीत दौरा केला. काही गावात ते प्रत्यक्ष जाऊन आले तर काही ठिकाणी पूल वाहून गेल्यामुळे जाताच आले नाही.

याबाबत ते म्हणाले, ‘चिपळूण (chiplun) शहरापासून ४० किलोमीटर अंतरावरील सह्याद्रीच्या खोऱ्‍यात वसलेल्या चोरवणे गावाकडील रस्त्याची दुरवस्था झाली होती. दोन दिवसात काडवली, वावे, पोसरे, कळंबस्ते, वालोपे, खेर्डी या वाशिष्ठी किनाऱ्यावरील गावांना वाशिष्ठीच्या रौद्ररूपाचा फटका बसला. नदीने पात्र बदलले असून भविष्यात त्याचा आणखी फटका बसणार आहे. तेथील संपर्क तुटलेला होता. किनाऱ्यावरील शेती वाहून गेली. नुसतेच पीक नव्हे तर जमीन खणून गेली होती. महावितरणचे विद्युत खांब वाहून गेल्याने वीज गेली. चिपळूणमधील दादर प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाण्याच्या मार्गात अनेक अडथळे होते. तिथे जाणेही अशक्य होते. विहिरी वाहून गेल्या आहेत. वाशिष्ठी किनार्‍यावरील १२ गावात ही परिस्थिती होती. भातशेती वाहून गेल्यामुळे भविष्याची चिंता भासणार आहे.

पावसामुळे डोंगरातील माती पाणी गेल्यामुळे सैल झाली आहे. त्यामुळे डोंगर भागात अजूनही भेगा गेल्या आहेत. तिथे भविष्यात भूस्खलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या भागात बऱ्याच ठिकाणी डोंगराच्या पायथ्याशी लोकवस्ती आहेत. खेड तालुक्यातील पोसरे गावात कोसळलेला डोंगराच्या ठिकाणी माथ्यावर भेगा पडल्या आहेत. पोसरेत प्रशासनाकडून मदतकेंद्र सुरू केले आहे, असे बने यांनी सांगितले.

रस्ता, वीज, पाण्याची गरज

दरड कोसळली, रस्ते खचलेत, काही ठिकाणी भेगा पडल्यात, पूल वाहून गेले आहेत. आधी गावाकडे जाण्यासाठी संपर्कासाठी मार्ग तयार करा. वीज नाही, पाणी नाही, त्यासाठी प्रयत्न करा, अशी आर्त हाक चिपळूण तालुक्यातील ग्रामीण भागात व्यक्त केली जात आहे, असे बने यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026: क्रिकेटपटूंचे ‘सुपर सिलेक्टर’ म्हणून प्रसिद्ध खजराना गणपती; दरवर्षी १ इंचाने वाढते स्वयंभू मूर्तीचा आकार?

Ganesh Chaturthi 2026 : गणपतीचे जन्मस्थान कोणते माहितीय ? इथे कधीच होत नाही गणेश विसर्जन ! जाणून घ्या डोडीतालचे रहस्य

Marathi News Live Updates : उद्धव ठाकरे कुटुंबीयांसोबत ‘मुंबईच्या राजा’च्या दर्शनाला

Asia Cup 2026 : 'त्यांच्याकडून आणखी काही मागू शकत नाही...', कर्णधार हरमनप्रीत कौरने चॅम्पियन झाल्यानंतर काय म्हणाली?

जया बच्चन तयार होईपर्यंत बिग बी काय करतात? KBCमध्ये अमिताभ बच्चन यांनी सांगितला मजेशीर किस्सा, म्हणाले...'आमच्या फॅमेली ग्रुपवर मी...'

SCROLL FOR NEXT