Lock Down Free Time Spent For Art Sindhudurg Marathi News
Lock Down Free Time Spent For Art Sindhudurg Marathi News  
कोकण

काही सुखद ! लॉकडाऊनचा रिकामा वेळ कलेसाठी खर्च 

रूपेश हिराप

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - कोरोनाच्या संकटात देश लॉकडाऊनच्या बंधनात अडकलेला आहे. काहींना नोकरी असतानाही त्याठिकाणी जाणे मुश्‍कील बनले आहे. त्यामुळे वेळ आहे; पण काम नाही, अशी स्थिती सध्या युवकांवर येऊन ठेपली आहे; मात्र सोनुर्ली येथील युवा गणेश मुर्तीकार सत्यवान हिराप यांनी लॉकडाऊनचा रिकामा वेळ आपल्या कलेत खर्ची घातला असून गणेशमूर्ती कामासोबत रंगकामही त्याने हातात घेतले आहे. 

तळकोकणात गणेश चतुर्थी धुमधडाक्‍यात साजरा केली जाते. आपल्या लाडक्‍या बाप्पाला सर्वजण वाजत-गाजत आपल्या घरात आणून विराजमान करतात. एकूणच हिंदू धर्मीयांमध्ये सर्वांत मोठा सण म्हणून गणेश चतुर्थीकडे पाहिले जाते. यावर्षी हा सण पंधरा दिवस आधी म्हणजे 22 ऑगस्टला साजरा होणार आहे; मात्र कोरोनाचे सावट यावर्षी या सणावर निश्‍चितच दिसून येणार आहे. 

सध्या लॉकडाऊन असल्यामुळे घरातील नोकरदार वर्ग घरातच अडकून पडला आहे. ना काम, ना धंदा अशा स्थितीत प्रत्येक जण कोरोनाशी मुकाबला करत आहेत. गणेश चतुर्थी सण डोळ्यासमोर ठेवता यावर्षी गणेश मूर्तिकारांना कमी कालावधी मूर्ती घडवण्यासाठी मिळणार आहे. लॉकडाऊनमुळे येणाऱ्या अडचणींचा सामनाही त्यांना करावा लागणार आहे. एकूणच या सर्व गोष्टींचा विचार करुन सोनुर्ली येथील युवा गणेश मूर्तिकार सत्यवान यांनी गणेश मुर्ती घडवण्याचे आणि आणि रंगकाम करण्याचे काम हाती घेतले आहे. 

सत्यवान हे गोव्यात करासवाडा म्हापसा येथे एका कंपनीमध्ये कामाला आहे; मात्र लॉकडॉऊनमुळे त्याला गोव्यात जाणे मुश्‍कील झाले आहे. सद्य परिस्थिती लक्षात घेता एकदा गोव्यामध्ये प्रवेश केल्यात पुन्हा सिंधुदुर्गात येणे मुश्‍कील आहे. शिवाय नेहमी ये-जा करणारया युवकांसाठी अद्यापही गोवा शासनाचा काही निर्णय झालेला नाही. त्यामुळे नोकरी असतांनाही राहण्याची सोय नसल्याने सत्यवान यांनी घरीच थांबणे पसंत केले आहे.

दोन महिन्यात येऊन ठेपलेली गणेश चतुर्थी आणि गणेश मूर्त्या घडवण्याची त्याच्यावर असलेली जबाबदारी ओळखून या युवकाने लॉकडाऊनचा रिकामी वेळ मूर्त्या घडविण्यात खर्ची घातला आहे. वडील (कै.) भगवान हिराप याच्या पश्‍चात त्यांनी गणेश मूर्ती शाळेची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन दोन भावाच्या मदतीने त्यांनी या धंद्यात आपला जम बसविला आहे. अल्पावधीतच त्यांनी ही कला आत्मसात केल्याने त्याचा कलेची स्तुती सर्वत्र होत आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT