साडवली (रत्नागिरी) : देवरुख बाजारपेठेतील भाजी व फळे विक्री शनिवार पासुन बंद राहतील असा मेसेज तालुक्यात फिरला आणि सगळीच दुकाने बंद राहणार असे समजले गेले .यामुळे शनिवारी देवरुख बाजारपेठेत नागरीक फिरकलेच नाहीत व आपोआपच लाॅकडाउन यशस्वी झाला.
भाजी दुकाने बंद राहतील असा तो मेसेज होता,शेवटच्या नागरीकापर्यंत हा मेसेज पोहचे पर्यंत सगळीच बाजारपेठ बंद राहणार असा मेसेज गेला.तशा चर्चाही रंगु लागल्या.यावेळी काही नागरीकांनी त्यांना समजवायचा प्रयत्न केला की भाजी फक्त बंद रहाणार व बाकीची दुकाने सुरु रहाणार तरीही सर्वच बंद राहणार अशी शक्यता गृहीत धरुन नागरीकांनी बाजारात येणे टाळले.
तो मेसेज पसरला अन्
यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट जाणवला व लाॅकडाउनही यशस्वी झाला.अफवा पसरली पण त्यातुन चांगलेच घडले व पोलीसांनाही थोडाकाळ विश्रांती मिळाली व ताणतणाव हलका झाला.किराणा,मेडीकल दुकानात यामुळे ग्राहकच आला नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.