Locked down photographers cameras due to lockdown In mandangad kokan marathi news 
कोकण

लॉकडाऊनमुळे फोटोग्राफर्सचे कॅमेरे लॉक ; कर्जाचे हफ्ते फेडणे झाले मुश्किल...

सचिन माळी

मंडणगड (रत्नागिरी) : कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात २१ दिवसांचा लॉक डाऊन करण्यात आला. त्याची झळ आता तीव्र होवू लागली असून अनेक व्यवसाय ठप्प झाल्याने व्यवसायिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. तसाच फटका मंडणगड तालुक्यातील फोटोग्रार्फसना बसला असून प्रि वेडिंग, साखरपुडे, लग्न, वाढदिवस असे सुमारे पन्नासच्यावर कार्यक्रम रद्द झाल्याने सुमारे २० लाखांपेक्षा अधिक नुकसान सोसावे लागले आहे. तसेच पुढील उर्वरित कार्यक्रमही कोरोनाच्या सावटाखाली असल्याने मोठी झळ बसण्याची शक्यता आहे. तर या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींवर बेरोजगाराची कुऱ्हाड कोसळली आहे.सर्वत्र संचार व जमाव बंदी आदेश लागू करण्यात आला आहे.

मंडणगडात लाखोंचा फटका

लॉक डाऊनमुळे सार्वजनिक, खाजगी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. मार्च ते मे या तीन महिन्यात तालुक्यात धार्मिक, सार्वजनिक व खाजगी कार्यक्रमांचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात येत. या तीन महिन्यात तर लग्नाचे असंख्य मुहूर्त साधले जातात. या कार्यक्रमाचे क्षण फोटो, व्हिडीओ शूटिंगच्या माध्यमातून संग्रहित ठेवण्यासाठी सर्वजण इच्छुक असतात. त्यामुळे फोटोग्राफीला प्रचंड मागणी असते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सर्वच कार्यक्रम रद्द करण्यात आल्याने तालुक्यातील फोटोग्राफर्सना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. तालुक्यात १३ जणांचे फोटोग्राफी व्यवसाय असून ६ फोटोग्राफीची दुकाने आहेत.

लग्न, साखरपुडे रद्द; बुकिंगचे पैसे परत; ..

त्यातील समीर कदम व शेखर कदम यांच्या प्रि वेडिंग-३, लग्न-५, बारसे-२, वाढदिवस-४, बेबी शॉवर-५ अशा एकुण १९ ऑर्डर रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच प्रभाकर मोडकले यांच्या साखरपुडा-३, लग्न-९, बेबी शॉवर-१ तर ऋषिकेश पवार यांच्या प्रि वेडिंग-४, साखरपुडा-२, लग्न-५, वाढदिवस-२, बेबी शॉवर-१ आणि अमित सुखदरे यांच्या प्रि वेडिंग-१, साखरपुडा-१, लग्न-४ अशा ऑर्डर रद्द झाल्या आहेत. या कार्यक्रमाचे केलेल्या आगाऊ बुकिंगचे पैसे परत करावे लागले. या व्यवसायातील समीर कदम, शेखर कदम, राजेंद्र महाजन, शरद लोखंडे, विजय, जितेश येसरे, शैलेश कासारे यांची तालुक्यात फोटोग्राफीचे दुकान असून व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. त्याची झळ संपूर्ण कुटुंबाला बसणार असून कोरोनाच्या लॉक डाऊनने मंदीची लाट पसरली आहे.

सरकारने आर्थिक संकटाबाबत विचार करावा
सर्वच कार्यक्रम रद्द झाल्याने व्यवसायावर प्रचंड मोठा परिणाम झाला आहे. घेतलेल्या ऑर्डर रद्द कराव्या लागल्या आहेत. त्यामुळे कुटुंबांचे आर्थिक गणित बिघडले असून शिक्षण खर्च, आजारपण, कर्जाचे हफ्ते फेडणे जड जाणार आहे. सरकारच्या या निर्णयाचा आम्हीही सामील असून यातून बाहेर पडण्यासाठी काळजी घेत प्रार्थना करीत आहोत. सरकार सर्वच बाबतीत सकारात्मक असून फोटोग्राफी व्यवसायिकांवर येणाऱ्या आर्थिक संकटाबाबत विचार करावा अशी मागणी आहे.
- समीर कदम, स्वाती डिजिटल फोटो स्टुडिओ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Sugar Factory : भोगावती साखर कारखान्याचा विक्रमी ऊस दर; राज्यातील सर्वाधिक दर देणारा कारखाना ठरला

IND vs AUS 4th T20I: शुभमन गिलची 'जागा' वाचवण्यासाठी संथ खेळी! सूर्यकुमार यादव पुन्हा अपयशी, ऑस्ट्रेलियाने आवळला फास...

'हा' मराठी अभिनेता उतरला निवडणुकीच्या रिंगणात? लढवणार नगरपालिकेची निवडणूक; पोस्टर शेअर करत दिली हिंट

Raj Thackeray : इथे कशाला टाईमपास करतोस? राज ठाकरेंनी पिट्याभाईला झापलं, मनसेच्या पुण्यातील बैठकीची Inside Story

Vijay Thalapathy: मुख्यमंत्रिपदाचे विजय उमेदवार; ‘टीव्हीके’च्या सभेत निर्णय, विधानसभेत दोनच पक्षांत लढत होईल

SCROLL FOR NEXT