LOTE MIDC the fire of gharda company reason short circuit in khed ratnagiri 
कोकण

Kokan : घरडा केमिकल कंपनीत लागलेल्या आगीचे कारण आले समोर

सकाळ वृत्तसेवा

खेड (रत्नागिरी) : लोटे येथील घरडा केमिकल कंपनीतील प्लांट 7 मधील रिऍक्‍टर चार्जिंग केल्यानंतर प्रेशर टेस्ट करून प्लांट बंद केला; परंतु रसायनाचे सुक्ष्म तुषार हवेत असताना विद्युत वाहक तारांमध्ये शॉर्ट सर्किट झाले आणि आग लागून पुढील दुर्घटना घडली, असे घरडा केमिकलचे व्यवस्थापन रामकृष्ण कुलकर्णी यांनी सांगितले. दरम्यान, या दुर्घटनेतील गंभीर जखमी अभिजित सुरेश तावडे यांची प्रकृती स्थिर आहे. 

या घटनेचा तपास करण्यासाठी कंपनीच्या स्थानिक व मुंबई येथील सुरक्षा व तांत्रिक तसेच उत्पादन अभियांत्रिकी विभागातील तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली आहे. या पुढे अशी दुर्घटना टाळण्यासाठी कंपनी व्यवस्थापन सक्रिय झाले असल्याचे श्री. कुलकर्णी यांनी सांगितले. शनिवारी (20) सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास लोटे एमआयडीसीतील घरडा केमिकल कंपनीच्या प्लांट क्र. 7 मध्ये रिऍक्‍टर चार्जिंग केल्यानंतर प्रेशर टेस्ट करून तो बंद केला. परंतु रसायनाचे सुक्ष्म तुषार हवेत असताना विद्युत वाहक तारांमध्ये शॉर्ट सर्किटमुळे ठिणगी पडून आगीचा भडका उडाला. त्यामध्ये घटनास्थळी उपस्थित असणारे पाचजण भाजले. त्यातील चौघांचा मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला. 

जखमी अभिजित सुरेश तावडे याच्यावर प्राथमिक उपचार करून तात्काळ मुंबई येथील नॅशनल बर्न हॉस्पिटल ऐरोली मुंबई येथे हलवण्यात आले. त्याची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर शस्त्रक्रिया झाल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. ते म्हणाले, घरडा कंपनीत दररोज 4 हजार कर्मचारी काम करतात. 20 मार्चला घडलेला अपघात ही एक दुर्दैवी घटना होती. या घटनेत ज्यांचा मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबीयांना कंपनीने तत्काळ 55 लाख प्रत्येकी देण्याचे जाहीर केले आहे. 

सर्व कर्मचारी देणार एक दिवसाचा पगार 

कंपनीतील कर्मचाऱ्यांचा एक दिवसांचा पगार मृत झालेल्या चारही जणांच्या कुटुंबीयांना मदत म्हणून देण्याचा निर्णयही सर्व कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. घरडा परिवारावर या अपघातामुळे मोठा आघात झाला असून त्यातून सावरण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत, असे कर्मचाऱ्यांच्याकडून सांगण्यात आले. 

औद्योगिक सुरक्षा संचालनालयाचे पथक दाखल 

राज्य शासनाचे औद्योगिक सुरक्षा संचालनालयाचे सह संचालक सुरेश जोशी व श्री दोरगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक रविवारी (21) कंपनीत दाखल झाले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ, औद्योगिक सुरक्षा विभाग, पोलीस विभाग या अपघात संदर्भात चौकशी करत आहे. त्यांना कंपनी व्यवस्थापकाकडून त्यांना पूर्ण सहकार्य करण्यात येत असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs UAE: what a throw! पाकिस्तानी खेळाडूने अम्पायरला चेंडू फेकून मारला, वसीम अक्रमने केलं कौतुक! सोशल मीडियावर ट्रोल

Kharadi Traffic : खराडी-हडपसर रस्त्यावर बेशिस्त पार्किंग, वाहतूक कोंडी व अपघाताची शक्यता; नागरिकांची कारवाईची मागणी

Handshake Controversy Timeline : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची टप्प्याटप्प्याने कशी नाचक्की होत गेली ते वाचा... Andy Pycroft प्रकरण त्यांच्यावरच कसं उलटलं?

Latest Maharashtra News Updates : आयएमएच्या राज्यस्तरीय बंदला कल्याणमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

Family Travel Tips: फॅमिलीसोबत प्रवासात निघालात? डिहायड्रेशनपासून बचावासाठी ही फळं सोबत ठेवा!

SCROLL FOR NEXT