Nitesh Rane News Sakal
कोकण

नितेश राणेंच्या मतदारसंघात भाजपचा दारुण पराभव; महाआघाडीचा 'विकास'

निवडणुकीत भाजपाच्या दोन दिग्गज नगरसेवकांचा पराभव झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

देवगड - सिंधुदुर्गातील देवगड नगर पंचायतीत महाविकास आघाडीने सत्ता प्रस्थापित केली आहे. या ठिकाणी भाजपा आणि शिवसेनेला प्रत्येकी ८ जागा मिळाल्या असून राष्ट्रवादीला १ जागा मिळाली आहे. या नगरपंचायतीत महाविकास आघाडीने सत्ता मिळवली आहे. नितेश राणे यांचा मतदारसंघाची असलेली ही नगरपंचायतीत भाजपची सत्ता होती. त्यामुळे ही भाजपाची सत्ता उलथवून टाकण्याचं काम महाविकास आघाडीने केले असल्याने कार्यकर्त्यांत जल्लोषी वातावरण निर्माण झाले आहे. निवडणुकीत भाजपाच्या दोन दिग्गज नगरसेवकांचा पराभव झाला आहे.

कुडाळमध्ये १७ जागा असून यासाठी १२ हजार ४४० मतदार होते. उर्वरित तिन्ही नगरपंचायतसाठी १७ जागा असून वाभवे-वैभववाडीसाठी १७७६ मतदार, कसई-दोडामार्गसाठी २७५३ मतदार तर देवगड-जामसांडेसाठी ११ हजार ५९६ मतदार होते. यातील २१ डिसेंबरला पहिल्या टप्प्यात झालेल्या मतदानावेळी कुडाळ नगरपंचायतसाठी सहा हजार ५३८ ( ७१.६२ टक्के) मतदारांनी मतदान केले होते. वाभवे-वैभववाडीसाठी ११३३ (८१.८६ टक्के) मतदान झाले होते. कसई-दोडामार्गसाठी १७६१ (८१.८७) टक्के मतदान झाले होते. देवगड-जामसंडेसाठी सहा हजार २३८ (७०.९२) टक्के मतदान झाले होते. एकूण १५ हजार ७०० मतदान (७३.०२) टक्के मतदान झाले होते. कुडाळ तीन हजार २६९ पैकी २४०७ (७३.६३ टक्के), वाभवे-वैभववाडी ३९२ पैकी ३२४ (८२.६५ टक्के), कसई-दोडामार्ग ६०२ पैकी ४८३ (८०.२३ टक्के) तर देवगड-जामसांडेसाठी १८०० पैकी दोन हजार ८५ (७४.४६ टक्के) मतदान झाले.

वैभववाडी-दोडामार्गमध्ये चुरशीने मतदान

चारही नगरपंचायतसाठी दोन्ही टप्प्यात झालेले मतदान पाहता वैभववाडी व दोडामार्गमध्ये चुरशीने मतदान झाले. सकाळी साडेसातला प्रक्रिया सुरू झाली. एकूण १६ केंद्रे होती. कुडाळ ९, वैभववाडी १०, दोडामार्ग ११ तर देवगडमध्ये १७ उमेदवार रिंगणात होते. दोन्ही टप्प्यांचा विचार केल्यास वैभववाडीत सर्वाधिक ५६, दोडामार्ग ५३, देवगड ५२ तर सर्वात कमी कुडाळ ५० उमेदवार रिंगणात होते. या सर्वांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Saif Ali Khan : सैफ अली खानला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला मोठा धक्का!

Latest Maharashtra News Updates : आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना लगावला टोला, म्हणाले...

SCROLL FOR NEXT