Mango weather changing trend re-enticed in Rajapur 
कोकण

शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर यामुळे हसू उमटले....

सकाळ वृत्तसेवा

राजापूर (रत्नागिरी) : अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि त्यानंतर हवामानामध्ये सातत्याने प्रतिकूल झालेले बदल यामुळे अनेक आंबा बागांमध्ये फळधारणा झालेली नाही. त्यामुळे आंबा बागायतदार आणि शेतकरी चिंताग्रस्त असताना पुन्हा नव्याने आंब्याला मोहोर आल्याने त्यांच्या चेहऱ्यावर हसू आले आहे.

सध्या मोहोरलेल्या झाडांना हंगामाच्या अंतिम टप्प्यामध्ये म्हणजे मे महिन्यामध्ये आंबा तयार होणार आहे. त्या आंबा पेटीद्वारे मार्केटमध्ये पाठवून समाधानकारक भाव मिळणे मुश्‍किल असले तरी कॅनिंगसाठी पाठविणे शक्‍य आहे. यावर्षी जुलै-ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाने धुमाकूळ घातला होता. त्यातून काजूच्या झाडांना कमी प्रमाणात पालवी फुटली.

 यंदा  मे महिन्यामध्ये तयार होणार आंबा

शेंडेमर रोगाने भर घातली. उताराच्या भागातील झाडांवर शेंडेमर रोगाचे प्रमाण तुलनेने जास्त राहिले. अशा स्थितीतून तरलेल्या काजूला ऑक्‍टोबर महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसाचा एकदा फटका बसला. त्यातून नोव्हेंबर महिन्यामध्ये कलमांना जी पालवी येणे अपेक्षित होती, ती आलेली नाही. परिणामी आंबा-काजूच्या झाडांना अपेक्षित असलेला मोहोर आलेला नाही. थंडीचे कमी प्रमाण, ढगाळ वातावरण अशा स्थितीतही काही झाडांना मोहोर आला. मात्र, प्रतिकूल परिणाम होऊन तो काळा पडून गळून गेला आहे. 

अपेक्षित भाव...
अनेक बागांमधील आंब्याची झाडे मोहोराविना रिकामी होती. गेल्या काही दिवसांमध्ये आंबा कलमांना पुन्हा मोहोर येऊ लागला आहे. हवामानामध्ये बदल न झाल्याने हा मोहोर टिकून राहून त्यातून फळधारणा होईल. मात्र, हा आंबा तयार होऊन त्याला अपेक्षित भाव मिळणे कठीण आहे. हा आंबा कॅनिंगद्वारे विक्री करता 
येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kini Toll Plaza Traffic : ‘फास्टॅग’ स्कॅनिंगला विलंब, किणी टोलनाक्यावर पाच किलोमीटर वाहनांच्या रांगा; पुणे बंगळुरू महामार्गावर वाहतूक कोंडी

Rajgad ST Bus: राजगड तालुक्यात एसटीचा खोळंबा; बस बंद पडल्याने ८० प्रवाशांना चार तास ताटकळावे लागले

IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध शेवटच्या दोन वनडेत श्रेयस अय्यर कर्णधार; शुभमन गिल-गौतम गंभीर का नसणार संघात?

TET Paper Leak: टीईटी पेपरफुटी प्रकरणाचे बीड कनेक्शन; शिरूरच्या प्रकाश मिसाळला अटक, आरोपींची संख्या १८ वर

Senagaon Farmer Death : हृदयद्रावक घटना ! वीजपुरवठा अचानक सुरू झाला अन् रोहित्रावरच शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू; मृतदेह ५ तास लटकत राहिला

SCROLL FOR NEXT