maratha reservation esakal
कोकण

Maratha Reservation: मनोज जरांगे पाटलांना सर्मथन देण्यासाठी मालवणातून जाणार 25 हजार मराठा बांधव

मराठा आरक्षण: २५ हजार मराठा बांधवांच्या सर्मथनासाठी मालवणातून जाणारे मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा देण्याची माहिती

CD

Maratha Reservation: मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी लढणारे मनोज जरांगे-पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी तसेच त्यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सभेला मालवण तालुक्यातून सुमारे २५ हजार समाज बांधव जाणार असल्याची माहिती अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अॅड. सुहास सावंत यांनी राठिवडे येथे आयोजित बैठकीत दिली.

मालवण तालुक्याच्या नियोजनाची जबाबदारी प्रशांत उर्फ बाबा सावंत यांच्याकडे देण्याचे बैठकीत निश्चित करण्यात आले. तालुक्यातील राठिवडे येथील कृष्णविलास बॅक्वेट हॉलमध्ये मालवण तालुका मराठा समाज बांधवांची बैठक अॅड. सावंत यांच्या नेतृत्वाखाली झाली.

यावेळी सुभाष धुरी, अभय भोसले, विनायक परब, अरुण भोगले, बाबा सावंत, प्रकाश कासले, शिवरामपंत पालव, शोभा पांचाळ, करुणा पुजारे, दिव्या धुरी, स्वप्नील पुजारे, बाळा सांडव, संदीप सावंत, डॉ. संभा धुरी उपस्थित होते.

मराठा समाजाच्या मागणीसाठी लढणारे जरांगे-पाटील यांचा डिसेंबरच्या पहिल्या किंवा पुढील आठवड्यात सिंधुदुर्ग जिल्हा दौरा जाहीर झाला असून केवळ तारीख निश्चित व्हायची आहे. यासाठी त्यांच्या सभेला व त्यांना पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातून एक ते दीड लाख तर मालवण तालुक्यातून सुमारे २५ हजार मराठा समाजबांधव उपस्थित राहणार आहेत. यासाठी मालवण तालुक्यातून श्री. सावंत यांच्यावर नियोजनाची जबाबदारी निश्चित केली आहे, अशी माहिती अॅड. सावंत यांनी दिली. सुभाष धुरी यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

SCROLL FOR NEXT