Sawantwadi-bhide-guruji
Sawantwadi-bhide-guruji 
कोकण

सावंतवाडीत होणारी भिडे गुरूजींची सभा वादात

अमोल टेंबकर

सावंतवाडी : पालिकेच्या परवागनीनंतर पोलिसांनी परवागनी नाकारल्याने स्वराज्य संघटनेच्यावतीने शहरात 23 ला आयोजित केलेली शिवप्रतीष्ठान हिंदुस्थानाचे संस्थापक अध्यक्ष संभाजीराव भिडे यांची सभा वादात सापडली आहे. त्या दिवशी नाताळ निमित्त ख्रिस्ती धर्माची मिरवणूक असल्यामुळे आम्ही सभेसाठी परवानगी नाकारली, असे पोलिसांचे म्हणणे आहे; मात्र पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरिक्षक अरुण जाधव हे नाहक दोन धर्मात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप आयोजक स्वराज्य संघटनेकडून करण्यात आला आहे. काही झाले तरी आम्ही सभा घेणारच यावेळी शांतता बिघडल्यास जाधव हे अधिकारी जबाबदार असणार आहेत, असा दावा संघटनेकडून करण्यात आला आहे. याबाबत संघटनेच्यावतीने पत्रकार परिषद घेवून माहिती देण्यात आली. यावेळी अमोल साटेलकर, सुनिल पेडणेकर, श्रीपाद सावंत, महेश पांचाळ, सोमनाथ गावडे, अजित सांगेलकर, नंदू कदम, कृष्णा धुळपनावर आदी पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार संघटनेच्यावतीने दीड महीन्यापूर्वी भिडे यांच्या सभेसाठी येथील पालिकेकतून परवागनी घेतली होती. त्यानंतर सर्व नियोजन केले होते; मात्र आज स्पिकर परवागनी घेण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांना त्यादिवशी त्या ठिकाणावरुन ख्रिस्ती धर्मीयांची मिरवणूक जाणार असल्यामुळे तुम्हाला परवानगी देता येणार नाही, असे पोलिसांनी सांगितल्यानंतर हा प्रकार आमच्या लक्षात आल्याचे पदाधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

यावेळी पदाधिकारी म्हणाले, यात दोन धर्माचा कोणताही वाद नाही; मात्र धर्माचे नाव पुढे करुन या ठिकाणी प्रभारी कार्यभार स्विकारलेले पोलिस अधिकारी अरुण जाधव हे राजकारण करू पाहत आहेत. त्यांच्या विरोधात संघटनेकडून यापूर्वी पोलिस महासंचालकांकडे तक्रार केली होती. त्याचा राग आता ते काढत आहेत; मात्र काही झाले तरी आम्ही ही सभा यशस्वी करणार आहोत. त्यासाठी आवश्यक असलेली परवानगी आम्हाला पालिकेकडून मिळाली आहे. त्यामुळे  जाधव हे बेकायदेशीररीत्या आपल्या पदाचा गैरवापर करुन ही परवानगी नाकारत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT