कोकण

पणदेरी धरणाला गळती; अधिवेशनानंतर मंत्र्यांची थेट धरणाकडे धाव

सचिन माळी -सकाळ वृत्तसेवा

मंडणगड (रत्नागिरी) : तालुक्यातील पणदेरी धरण (Panderi Dam)गळतीमुळे धोकादायक झाल्याचे वृत्त समजताच कोकणातील मंत्री, आमदार, खासदार व लोकप्रतिनिधी यांनी पणदेरी धरणाकडे धाव घेत घटनास्थळी भेट दिली. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडे घटनेचा आढावा घेत मार्गदर्शक सूचना केल्या. यामुळे दुर्लक्षित तालुक्याकडे आपत्तीकाळात केलेल्या दौऱ्याबद्दल तालुकावासीय समाधान व्यक्त करीत आहेत. खासदार विनायक राऊत, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, आमदार योगेश कदम, राजन साळवी यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी पणदेरी येथे घटनास्थळी दोन दिवसांत भेटी दिल्या.

मंत्री उदय सामंत म्हणाले, ‘‘सदर धरणाच्या गळतीची माहिती तत्काळ मिळाली. मुंबईत पावसाळी अधिवेशन चालू असल्यामुळे अधिवेशनात होतो. येथील स्थानिक आमदार योगेश कदम यांनी त्वरित जलसंपदा मंत्री जयंत पाटील व राज्यमंत्री बच्चू कडू यांची भेट घेतली. धरणाबाबत माहिती देत ताबडतोब प्रशानास सूचना केली. धरणांतर्गत येणाऱ्या वाड्यांचे स्थलांतर करण्याचे आदेश दिले. तसेच त्या धरणाचे पाणी जेवढे शक्य होईल तेवढे कमी करून धरण रिकामे कसे करता येईल याचे नियोजन करण्यास सांगितले.

आमदार योगेश कदम यांनी तातडीने घटनास्थळी पोहचून जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्यासमवेत परिस्थितीचा आढावा घेत दिवसभर थांबून धोका पूर्ण टळेपर्यंत लक्ष दिले.

आमदार कदम यांच्याकडून वस्तूंचे वाटप

स्थलांतर केलेल्या कुटुंबाना आमदार योगेश कदम यांच्याकडून जीवनावश्यक वस्तू व ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, प्रांताधिकारी शरद पवार, तहसीलदार नारायण वेंगुर्लेकर, कृषी पशुसंवर्धन सभापती रेश्मा झगडे, शिवसेना तालुकाप्रमुख प्रताप घोसाळकर, सभापती स्नेहल सकपाळ, उपसभापती प्रणाली चिले उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांची गांधीगिरी ! न्या. स्वर्णकांता यांच्या न्यायालयात उपस्थित राहणार नाहीत; 'या'मुळे अवलंबला सत्याग्रहाचा मार्ग

Nanded News: उष्णतेच्या झळांनी जनजीवन विस्कळित; पारा ४३ अंश सेल्सिअसपर्यंत ; उष्माघात, डिहायड्रेशनच्या तक्रारीत वाढ

Mumbai: मान्यतेशिवाय शाळा सुरूच! मुंबईत १६४ अनधिकृत शाळा; शिक्षण विभागावर सवाल

Latest Marathi News Live Update : मालवण चिवला बीचवर लाखोंच्या संख्येने मासे किनाऱ्यावर धडकले, मत्स्य खवय्यांची मासे जमा करण्यासाठी झुंबड

मान्सूनबाबत मोठी बातमी! यंदा लवकर आगमन, केरळात कधी धडकणार?

SCROLL FOR NEXT