मिऱ्या-नागपूर चौपदरीकरण; पाच गावांसाठी ७३ कोटींचा निधी sakal media
कोकण

मिऱ्या-नागपूर चौपदरीकरण; पाच गावांसाठी ७३ कोटींचा निधी

पुढील महिन्यात वाटप, १३ गावे निधीच्या प्रतीक्षेत

राजेश शेळके : सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : कोकणला पश्‍चिम महाराष्ट्र आणि विदर्भाला जोडणाऱ्‍या मिऱ्‍या-नागपूर मार्गाच्या चौपदरीकरणाला आता गती मिळाली आहे. निवाडा जाहीर होईल, तसा शासनाकडून भूसंपादनाचा निधी प्रशासनाला दिला जात आहे. मिऱ्या ते साखरप्यापर्यंत जिल्ह्यातील २८ गावांचा या मार्गामध्ये समावेश आहे. त्यापैकी १५ गावांना निधी आला आहे; मात्र १३ गावे अजूनही निधीच्या प्रतीक्षेत होती. पैकी पाच गावांची प्रतीक्षा संपली असून या पाच गावांसाठी ७३ कोटीचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला. पुढच्या महिन्यात खातेदारांच्या बॅंक खात्यात भूसंपादानाचा मोबदला जमा होणार आहे.

रत्नागिरी ते कोल्हापूर १३४ कि.मी.च्या मार्गाचे भूसंपादन पूर्ण झाले आहे. मिऱ्या ते साखरप्यापर्यंत जिल्ह्यातील २८ गावांचा या मार्गात समावेश आहे. त्यापैकी १५ गावांना निधी आला आहे; मात्र १३ गावे अजूनही निधीच्या प्रतीक्षेत होते. त्यासाठी सुमारे ४४२ कोटी निधी अपेक्षित असल्याचे महसूल विभागाने शासनाला कळवले होते. या मार्गामध्ये जिल्ह्यातील २८ गावांचा समावेश आहे. १५ गावांचे भूसंपादन होऊन निवाडा जाहीर झाल्यानंतर ३१९ कोटी रुपये त्यांना वाटप करण्यात आले; मात्र उर्वरित १३ गावांमधील भूसंपादन झाले असले तरी निवाडा जाहीर झालेला नाही. त्यामुळे या भूसंपादनापोटी ४४२ कोटीची मागणी जिल्हा प्रशासनाने केली आहे.

त्यामध्ये नाचणे (या भागातील काही खातेदारांची रक्कम वाटप झाली आहे तर काहींची शिल्लक आहेत.) झाडगाव, खेडशी, कारवांचीवाडी, नागलेवाडी, पोमेंडी खुर्द, कोंडगाव, निनावे, जंगलवाडी (संगमेश्वर), मेढेतर्फे देवळे, करंजारी, दख्खन या गावांचा समावेश आहे. या गावांचा निवाडा जाहीर न झाल्यामुळे या गावांची भूसंपादनाची रक्कम अद्याप प्राप्त झालेली नाही.

प्रक्रिया डिसेंबर महिन्यात सुरू

पाच गावांचा निवाडा झाल्यामुळे त्यांना शासनाने निधी दिला आहे. यामध्ये जंगलवाडी (संगमेश्वर), मेढेतर्फे देवळे, करंजारी या तीन गावांसाठी ५० कोटी तर निनावे आणि दख्खन या दोन गावांसाठी २३ कोटी असा एकूण ७३ कोटीचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला. खातेदारांच्या बॅंक खात्यामध्ये भूसंपादनाचा मोबदला जमा होण्याची प्रक्रिया डिसेंबर महिन्यात सुरू होईल, असे प्रांतानी स्पष्ट केले.

एक नजर..

  • नागपूर ते रत्नागिरी ५४८ कि.मी.

  • २००१ पासून सुरू होती मागणी

  • मार्च २०१३ मध्ये अधिसूचना जारी

  • दख्खन गावातील ३२१ खातेदार

एक दृष्टिक्षेप..

  • १३ गावांसाठी सुमारे ४४२ कोटी निधी अपेक्षित

  • १५ गावांचे भूसंपादन होऊन निवाडा जाहीर

  • ३१९ कोटी रुपयांचे गावांना केले वाटप

  • जंगलवाडी, मेढेतर्फे देवळे, करंजारीसाठी ५० कोटी

  • निनावे आणि दख्खन दोन गावांसाठी २३ कोटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात आमदारकीच्या 9 जागांसाठी धूमशान, निवडणूक आयोगाकडून मतदान अन् मतमोजणीची तारीख जाहीर

Hasan Mushrif vs Shivaji Patil : मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार शिवाजी पाटलांमध्ये बिनसलं, मुश्रीफांवर गंभीर आरोप करत अप्रत्यक्ष सतेज पाटलांवर टीका

Latest Marathi News Live Update : विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणाला उष्णतेचा येलो अलर्ट

Temple Travel: रेन अलर्ट देणारे ‘मान्सून’ मंदिर! पाऊस येण्याआधीच छतातून टपकतात थेंब, विज्ञानाला न सुटलेले कोडे..

Saving Money Tips : बंगळूरसारख्या महागड्या शहरात 22 वर्षांच्या तरुणीचा 18 हजारांत संसार! कसं करते मॅनेज? जाणून घ्या तिचं 'सिक्रेट'

SCROLL FOR NEXT