Mistake On Inaugration Board Uday Samant Comment Ratnagiri Marathi News  
कोकण

नामफलकावर विसरले गावाचे नाव, यावर मंत्री उदय सामंत म्हणाले...

सकाळवृत्तसेवा

लांजा ( रत्नागिरी ) - कोकणाला विकास कामात खऱ्या अर्थाने झुकते माप शिवसेनेनेच दिले आहे. गेले अनेक वर्षांची गोळवशी - वडद - हसोळ ग्रामस्थांची मागणी शिवसेनेच्या माध्यमातून मार्गी लागली आहे. मुचकुंदी नदीवरील हा पूल दोन गावांनाच जोडणारा नसून दोन गावातील ग्रामस्थांची मने जोडणारा असल्याचे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी गोळवशी येथे केले. 

लांजा तालुक्‍यातील गोळवशी - वडद - हसोळ दरम्यानच्या मुचकुंदी नदीवर बांधण्यात येणाऱ्या पुलाच्या कामाचे भूमिपूजन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत व रत्नागिरी - सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते पार पडले. यावेळी श्री. सामंत बोलत होते. यावेळी विलास चाळके, लीला घडशी, दीपाली दळवी - साळवी, पूजा आंबोळकर, तहसीलदार पाटील, यशवंत भांड, विनोद सावंत, प्रकाश गुरव, गोळवशी सरपंच अशोक गुरव उपस्थित होते. 

सामंत म्हणाले, मंत्री झाल्यावर हे पहिलेच भूमिपूजन माझ्या हस्ते होत आहे. त्याचा मला आनंद आहे. येथील ग्रामस्थांची अनेक वर्षांची मागणी आता मार्गी लागत आहे. त्यामुळे नावावरून वाद निर्माण करू नका. काही तांत्रिक कारणांमुळे नामफलकावरील नावात चूक झाली असली तरी येत्या 24 तासात झालेली चूक सुधारली जाईल. हा शब्द याठिकाणी आज मी देत आहे. तशा सूचना आजच मी संबंधित अधिकाऱ्यांना देत आहे. हा पूल तर होईलच परंतु या पुलाच्या पुढील रस्ता देखील होणे आवश्‍यक आहे. त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून दिला जाईल. पुढच्या रस्त्याची हमी देतो. शिवसेनेच्या माध्यमातून खासदार विनायक राऊत व आमदार राजन साळवी या दोघांचे हात बळकट करण्याचे आवाहनही त्यानी केले. 

खासदार विनायक राऊत यांनी सांगितले की, गाव हे विकासाचे केंद्रबिंदु मानून काम केले की, गावचा विकास व्हायला वेळ लागत नाही. गोळवशी गावाने ते दाखवून दिले आहे. त्यामुळे यापुढे या गावाच्या विकासासाठी कधीही निधी पडू देणार नाही. या गावच्या विकासासाठी कायम कटिबद्ध आहोत. याप्रसंगी आमदार राजन साळवी यांनीही मनोगत व्यक्त केले. 

नामफलकावरील नावावरून ग्रामस्थांची नाराजी 

मूचकुंदी नदीवर होणाऱ्या पुलाच्या भूमिपूजन कार्यक्रमाच्या नामफलकावर केवळ गोळवशी गावाच्या नावाचाच उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे वडद - हसोळ गावातील ग्रामस्थ कमालीचे नाराज झाले आहेत. या कार्यक्रमात अलिप्त बसत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. मात्र सामंत व राऊत यांनी त्यांची समजूत काढली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed News: उन्हाची तीव्रता वाढतीच : चाळीस टक्के साठा; आणखी एक आवर्तन मिळणार, पिकांना दिलासा; माजलगाव धरणातून वेगाने घटतोय पाणीसाठा

Beed News: बीड जिल्ह्यात पुन्हा इंधनटंचाई; पंप कोरडेठाक, वाहतुकीवर परिणाम; पेट्रोल-डिझेलच्या तुटवड्यामुळे शहरात वाहनांच्या रांगा

कोलकताविरुद्ध हैदराबादचे पारडे जड; अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिड हेड, हेन्रिक क्लासेन यांचा झंझावात रोखण्याचे आव्हान, पाहा कशी असेल Playing XI

Beed News: स्लिम संरक्षण कायद्याच्या मागणीसाठी बीडमध्ये धरणे आंदोलन; मॉबलिंचिंग पीडितांना मदत आणि सरकारी नोकरीसाठी मागणी

Solapur ST Caste Certificate: चक्क दिवसात मिळविले एस.टी. जात प्रमाणपत्र; ‘उत्तर’च्या प्रांताधिकाऱ्यांकडे तक्रार; खोटी कागदपत्रे जोडली अन् काय घडलं!

SCROLL FOR NEXT