Narendra Modi Nitesh Rane  esakal
कोकण

Nitesh Rane : 'मनमोहन सिंगांना स्वातंत्र्य नव्हतं, त्यामुळंच 140 कोटी जनतेनं मोदींच्या हातात सत्ता दिली'

मोदींच्या नेतृत्वाखाली विकासाची घोडदौड सुरू ठेवली. प्रगतीच्या दिशेने निर्णय घेतले गेले.

सकाळ डिजिटल टीम

मोदींच्या नेतृत्वाखाली विकासाची घोडदौड सुरू ठेवली. प्रगतीच्या दिशेने निर्णय घेतले गेले. गरीब कल्याणच्या दिशेने देशाची वाटचाल सुरू आहे.

कणकवली : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वामुळे केंद्रातील नऊ वर्षांच्या कालखंडामध्ये देश महासत्तेच्या दिशेने पुढे जात आहे. ‘सबका साथ, सबका विकास’ हे घोषवाक्य घेऊन शेवटच्या घटकापर्यंत पोहचण्यासाठी नववर्षाच्या यशोगाथाची ही पहिली पायरी आहे,’ असे प्रतिपादन भाजपचे आमदार नीतेश राणे (Nitesh Rane) यांनी येथे पत्रकार परिषदेत केले.

केंद्राच्या नववर्षाच्या कारकिर्दीचे जनसंपर्क अभियान ३० मे ते ३० जून या कालावधीत राबविण्यात येत आहे. विविध टप्प्यांमध्ये त्या अभियानानुसार केंद्राने केलेल्या विकास योजना आणि वैयक्तिक लाभाच्या योजना घरोघरी पोहचवल्या जाणार आहेत, असेही ते म्हणाले.

जनसंपर्क अभियानाची माहिती देण्यासाठी काल येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी माजी खासदार तथा भाजप नेते नीलेश राणे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष तथा भाजप प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, भाजप संघटकमंत्री प्रभाकर सावंत, माजी सभापती मनोज रावराणे, मिलिंद मेस्त्री, आनंद शिरवलकर आदी उपस्थित होते.

आमदार राणे म्हणाले, ‘‘केंद्राच्या २०१४ ते २०२३ हा देशाचा सुवर्णकाळ होता. मोदींच्या नेतृत्वाखाली विकासाची घोडदौड सुरू ठेवली. प्रगतीच्या दिशेने निर्णय घेतले गेले. गरीब कल्याणच्या दिशेने देशाची वाटचाल सुरू आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली देशाची वेगळी ओळख जगभरात निर्माण झाली. यापूर्वीचे सरकार भ्रष्टाचाराने भरबटलेले होते. त्यामुळे देशाची भ्रष्ट देशांमध्ये नोंद होती. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांना स्वातंत्र्य नव्हते. त्यामुळे १४० कोटी जनतेने मोदी यांच्या हातामध्ये देशाची सत्ता दिली.

'या सत्तेच्या काळात प्रत्येक घटकाला मोदींनी न्याय देण्याचा प्रयत्न केला. शेतकरी सन्मान योजना, मच्छीमारांसाठीही वेगवेगळ्या योजना, मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण होत आहे. कोकण रेल्वेचाही विकास होत आहे. पंतप्रधान आवास योजना देशभरातील लाभार्थींना हक्काचे घर मिळाले. जलजीवन मिशन योजनेअंतर्गत प्रत्येक घरात नळाचे पाणी पोहोचत आहे.'

सबका साथ सबका विकास हे घोषवाक्य घेऊन धार्मिक स्थळांचाही विकास केला जात आहे. ग्रामीण भागाबरोबरच शहरात स्मार्ट सिटी ही संकल्पना राबवली. वंदे भारत ही जगभरात वेगळी ओळख असणारी ट्रेन देशात धावू लागली. मेट्रोचे जाळे शहरात पसरत आहे. त्यामुळे येत्या २०२४ मध्ये केंद्राची सत्ता भाजपच्या हाती राहणार असून फिर एक बार मोदी सरकार येईल, असेही राणे म्हणाले.

तिसरी आघाडी अस्तित्वात नाही

भाजप कामाच्या जोरावर पुढे जात आहे. त्यामुळे मोदींची स्पर्धा करणारी व्यक्ती विरोधकांकडे नाही. त्यामुळे तिसरी आघाडी अस्तित्वातच येणार नाही, असा दावाही राणे यांनी केला. आघाडीचा हा प्रयोग अनेकदा झाला; पण तो टिकला नाही, असेही ते म्हणाले.

असे असेल जनसंपर्क अभियान

  • जिल्ह्यात एक जाहीर सभा

  • संयुक्त मोर्चा संमेलन

  • जिल्ह्यातील व्यापारी संमेलन

  • योजनेच्या लाभार्थींची भेट

  • २१ जून योग दिवस साजरा

  • ‘संपर्क ते समर्थन’ अभियान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT