Ganpatipule Beach Ratnagiri esakal
कोकण

Cyclone Biparjoy : गणपतीपुळेला जाण्याचा विचार करताय? मग ही बातमी आधी वाचा, अन्यथा होऊ शकतं नुकसान!

बिपरजॉय चक्रीवादळाच्या (Cyclone Biparjoy) प्रभावामुळे कोकणकिनारपट्टीवर (Konkan) अचानक लाटांचा तडाखा बसत आहे.

सकाळ डिजिटल टीम

चक्रीवादळामुळे समुद्र खवळलेला असून, १६ जूनपर्यंत ही स्थिती राहण्याची शक्यता आहे. अचानक उंच लाटा किनाऱ्यांवर धडकत आहेत.

रत्नागिरी : बिपरजॉय चक्रीवादळाच्या (Cyclone Biparjoy) प्रभावामुळे कोकणकिनारपट्टीवर (Konkan) अचानक लाटांचा तडाखा बसत आहे. गणपतीपुळे (Ganapatipule) येथे रविवारी (ता. ११) सायंकाळी याचा प्रत्यय आला. यामध्ये सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. या लाटेमुळे ४९ व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे.

पुन्हा असा प्रकार घडू नये यासाठी गणपतीपुळे किनाऱ्या‍वर पर्यटकांना (Tourists) जाण्यास प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली असून, जीवरक्षक तैनात केले आहेत. जिल्ह्यातील अन्य किनाऱ्यांवरही पर्यटकांनी जाऊ नये, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.

चक्रीवादळामुळे समुद्र खवळलेला असून, १६ जूनपर्यंत ही स्थिती राहण्याची शक्यता आहे. अचानक उंच लाटा किनाऱ्यांवर धडकत आहेत. सोमवारीही अशीच परिस्थिती गणपतीपुळेसह रत्नागिरीतील भाट्ये, आरेवारे, नेवरे किनाऱ्यांवर आहे. त्यामुळे पर्यटकांनी पाण्यात उतरू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. गणपतीपुळे येथे पोलिसही लक्ष ठेवून आहेत. तिथे बोर्डही लावण्यात आला असून, जीवरक्षकांची करडी नजर आहे.

पर्यटकांना किनाऱ्या‍वर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. काल सकाळी किनाऱ्या‍वर दोरी बांधून ठेवण्यात आली आहे. रविवारी सायंकाळी गणपतीपुळे किनारी अचानक आलेल्या मोठ्या लाटेनंतर प्रशासन सतर्क झाले आहे. या लाटेमध्ये काही पर्यटक जखमीही झालेत. याचा सर्वाधिक फटका किनाऱ्यावरील नारळ व्यावसायिक, फेरीवाले यांना बसला.

साहित्य वाहून गेल्यामुळे ४९ व्यावसायिकांचे सुमारे साडेतीन लाखांचे नुकसान झाले आहे. त्यातील दिनेश नावाच्या एका व्यावसायिकाची २७ हजार रुपयांची रोख रक्कम आणि अन्य साहित्य वाहून गेले. आठ जणांचे दहा हजारांपेक्षा अधिक नुकसान झाले. पालकमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी (ता. १२) परिस्थितीची पाहणी करून व्यापाऱ्यांशी चर्चा केली. प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. यामध्ये पाच हजार चारशे रुपये सरसकट भरपाई दिली जाणार आहे.

पालकमंत्री सामंत यांनी मोठे नुकसान झालेल्यांना वैयक्तिक दहा हजार रुपये जाहीर केले आहेत. यावेळी सरपंच कल्पना पकये, डॉ. विवेक भिडे, अमित घनवटकर, गजानन पाटील, कल्पेश सुर्वे, संदीप कदम, मुख्य पुजारी उमेश घनवटकर, प्रांताधिकारी विकास सूर्यवंशी, तहसीलदार राजाराम म्हात्रे, गटविकास अधिकारी जे. पी. जाधव, महेश ठावरे, रवी ठावरे, महेश केदार, उमेश भणसारी, प्रकाश साळवी, अमित पाटील, राजू साळवी, अतुल पाटील आदी उपस्थित होते.

पर्यटकांनी मोह आवरावा

पालकमंत्री सामंत यांनी पर्यटकांना आवाहन करत किनाऱ्‍यावर न जाण्याची सूचना केली आहे. ते म्हणाले, ‘‘चक्रीवादळाच्या प्रभावामुळे समुद्र खवळला असून, प्रवाह बदलत आहेत. येथे येणारे पर्यटक सुरक्षित राहणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे पोहण्यासाठी समुद्रात जाण्याचा मोह पर्यटकांनी आवरला पाहिजे.’’

जीव धोक्यात घालू नका

सोमवारीही वाऱ्‍याचा जोर कायम असून, समुद्र खवळलेला आहे. गणपतीपुळेसह तालुक्यातील आरेवारे, भाट्ये, मांडवी, नेवरे या किनाऱ्‍यांवरही लाटांचे तांडव सुरू आहे. भरतीवेळी लाटांचा जोर वाढत आहे. पर्यटक व स्थानिक नागरिकांनीही किनाऱ्‍यावर जाऊन पाण्यात उतरू नये, असे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी आवाहन केले आहे. पश्चिम महाराष्ट्र व मुंबईतून आलेले पर्यटक खवळलेल्या समुद्रातही पाण्यात उतरण्यासाठी धडपडत असतात, परंतु अतिरेकपणा करून स्वत:चा जीव धोक्यात घालू नये, असेही सुचित केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : आमदार अपात्रतेप्रकरणी आठवड्याभरात निर्णय घ्या; अन्यथा कारवाई करू; सरन्यायाधीशांचा विधानसभा अध्यक्षांना थेट इशारा

Crime: शरीरावर जखमा, फाटलेले कपडे, पुरूषाची चप्पल... रेल्वे स्थानकाजवळ अज्ञात महिलेचा अर्धनग्न मृतदेह अन्..., नेमकं काय घडलं?

Pune Petrol Pump Attack Criminals Arrested : पुण्यात नदीपात्रात दडून बसलेल्या दोन अट्टल गुन्हेगारांना, पोलिसांनी सापळा रचून पकडलं!

Latest Marathi Breaking News:अमित ठाकरे यांची त्यांच्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यावर पहिली प्रतिक्रिया

कलाकार खूप फॅन्सी जेवतात? मुळीच नाही, गिरीजा ओकने दाखवलं जेवणाचं ताट; वरणभात, अळूवडी अन्...

SCROLL FOR NEXT